Bicholim News : डिचोलीत दरडींपासून धोका; वाहनचालकांत भीती

Bicholim News : बगलमार्गाचे हल्लीच उद्‍घाटन
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, येथील व्हाळशी ते वाठादेव हा चौपदरी बगलमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी या मार्गावर आता दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पिराची कोंड परिसरात एका ठिकाणी दरड कोसळण्याच्या वाटेवर आहे.

येथे असलेले भलेमोठे दगड खचले असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.राज्य महामार्ग-१ अंतर्गत येणाऱ्या डिचोली शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या व्हाळशी ते वाठादेव या चौपदरी बगलमार्गाचे गेल्याच आठवड्यात लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच धोकादायक दरडीमुळे भीती निर्माण झाली आहे.

Bicholim
Goa Crime News: फोंड्यात क्रेनने मोटारसायकल पायलटला चिरडले; चालक अटकेत; गरीब कुटुंबाने गमावला आधारस्‍तंभ

जवळपास ४.२ किलोमीटर अंतराचा हा चारपदरी बगलमार्ग आहे. या मार्गासाठी सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावरुन वाहनांची ये-जा सुरु झाली आहे.

उपाययोजना करा

व्हाळशी ते वाठादेव बगलमार्गासाठी वाठादेवसह पिराची कोंड आदी काही ठिकाणी डोंगर कापणी करावी लागली आहे. दोन ते तीन ठिकाणी धोकादायक स्थिती असून दरड कोसळण्याचा धोका आहे. पावसाळ्यात हा धोका अधिक संभवत आहे. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्यात यावी. धोकादायक दरडी हटवाव्यात अथवा दरडी भोवताली जाळी मारावी, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com