Cyber Crimes in Goa Using Social Media: महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती गोवा सायबर क्राईमच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत या प्रकणात दुपटीने वाढ झाली आहे. यामागे मुख्य कारण सोशल मीडियाचा अतिवापर आणि पुरेशी काळजी न घेतल्याने ब्लॅकमेलर्स त्याचा गैरफायदा घेतात. असे सावंत म्हणाल्या.
डिस्प्ले पिक्चर (डीपी) किंवा प्रोफाईल पिक्चर सोशल साईट्सवर वारंवार बदलल्याने तुम्ही सायबर क्राईमला बळी पडू शकता. वारंवार डीपी बदलणाऱ्यांना सायबर गुन्हेगार टार्गेट करू शकतात. सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी गोवा पोलिसांनी महिलांना वारंवार डीपी न बदलण्याचा सल्ला दिला आहे.
'फेसबुक, इंस्टाग्रामवर आपण शक्य तितकी कमी छायाचित्रे अपलोड केली पाहिजेत आणि स्वत:ची अधिक माहिती उघड करू नये. तसेच, वारंवार डीपी बदलू नये. कारण फसवणूक करणारे प्रथम अशा खात्यांचा वापर करतात.' असे पोलिस अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या.
सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून तुमच्यावर टीका आणि छळही होऊ शकतो. वारंवार पोस्ट करून तुम्ही लोकांसमोर स्वत:ला एक्सपोज करत आहात आणि या प्रकाराला बळी पडू शकता. त्यामुळे कमी फोटो अपलोड करावेत असा सल्ला सावंत यांनी दिला आहे.
गोवा पोलिसांनी 2022 मध्ये महिलांविरुद्ध 90 सायबर गुन्हे नोंदवले असून या वर्षात आतापर्यंत 52 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर, 2021 मध्ये 38 प्रकरणं नोंदवण्यात आली होती.
तसेच, फेक सोशल मीडिया अकाऊंट काढून दुसऱ्याची ओळख घेऊन फसवणूक केलेल्या 48 घटनांची नोंद झाली आहे.
दरम्यान, सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांतून सर्वसामान्यांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक होत आहे. गोव्यात सन 2021 पासून सायबर गुन्ह्याची 179 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील 99 प्रकरणे तोतयागिरीद्वारे फसवणुकीची आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.