Curchorem Development : ...तरच पुढील निवडणूक लढविणार - नीलेश काब्राल

नीलेश काब्राल : ओव्हरब्रिजच्या उद्‌घाटनप्रसंगी कुडचडेतील लोकांशी साधला संवाद
Nilesh Cabral : Inauguration of Overbridge
Nilesh Cabral : Inauguration of OverbridgeDainik Gomantak
Published on
Updated on

केपे : कुडचडे मतदारसंघात सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर असून विकासकामांमुळे लोकांना काही प्रमाणात त्रास होतोय हे मला माहीत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला साथ दिली तर मी निवडणूक लढवणार, जर तुम्ही मला निवडणुकीत उतरू नये असे सांगितल्यास मी निवडणूक लढवणार नाही, असे कुडचडेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

कुडचडे येथे रेल्वे ओव्हरब्रिजच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष जास्मीन ब्रागांझा, उपनगराध्यक्ष ऋचा वस्त, नगरसेवक प्रमोद नाईक, प्रसन्न भेंडे, प्रदीप नाईक, टोनी फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

कुडचडे येथील हा ओव्हरब्रिज लोकांसाठी अत्यंत गरजेचे होता व तो एका वर्षात पूर्ण करून आज लोकांसाठी खुला केल्याने नगराध्यक्ष जास्मीन ब्रागांझा यांनी आमदार काब्राल यांचे अभिनंदन केले.

Nilesh Cabral : Inauguration of Overbridge
West Bengal Politics: बंगाल हिंसाचारावर अमित शहांचं मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये, ममता सरकारकडे...

‘कुडचडे’चा कायापालट करणार

कुडचडे मतदारसंघात विविध विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कामांना सुरवातही झाली आहे. येथील विविध भागांमधील समस्या जाणून घेऊन मतदारसंघाचा कायापालट करण्याचा माझा प्रयत्न असून विरोधकांना याचा त्रास होत आहे.

कामराळ येथे अंडरपास रस्ता करून द्यावा, अशी कित्येक वर्षांची लोकांची मागणी होती, तीसुद्धा रेल्वेच्या सहकार्याने पूर्ण करून लोकांचा हा प्रश्न सोडवून देण्यात मी यशस्वी ठरलो, असे मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

Nilesh Cabral : Inauguration of Overbridge
Maharashtra Politics: आरोपांचं राजकारण करण्यापेक्षा... छत्रपती संभाजीनगरमधील राड्यानंतर अजित पवार संतापले

विकासकामांना जोर

रेल्वे दुपदरीकरण कामासाठी कित्येक लोकांच्या जमिनी गेल्या आहेत व या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यात बदल करून २०१३ ॲक्टप्रमाणे चांगली किंमत लोकांना मिळवून दिली आहे. शेळवण-कुडचडे येथेही ओव्हरब्रिजचे काम मार्गी लावणार आहे.

सध्या भूमिगत वीजवाहिन्या व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम जोरात सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत ते मे महिना संपेपर्यंत दुरुस्त करण्यावर भर दिला जाणार असून उर्वरित ठिकाणी ही कामे पावसानंतर करण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

Nilesh Cabral : Inauguration of Overbridge
Pakistan Politics: इस्लामाबाद न्यायालयाचा आदेश, इम्रान खान शरण आल्यास...

कुडचडे-खामामळ येथे जी रेल्वे गेट होती ती रेल्वे दुपदरीकरण कामासाठी कायमची बंद केली होती व या कारणाने लोकांना खूप त्रास होत होता. येथून ये-जा करताना दुसऱ्या मार्गाचा वापर लोकांना करावा लागत होता. यासाठी लोकांच्या मागणीनुसार हा ओव्हरब्रिज उभारण्यात आला आहे. भारतीय रेल्वेतर्फे देशात आतापर्यंत दुचाकीचालकांसाठी असा ओव्हरब्रिज कुठेच बांधला गेला नसून देशातील हा पहिलाच ओव्हरब्रिज आहे. त्यामुळे याचा दुचाकीचालकांनी योग्यप्रकारे उपयोग करावा.

- नीलेश काब्राल, आमदार, कुडचडे मतदारसंघ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com