Arambol Demolition: सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर हातोडा; हरमल येथे 9 बांधकामे जमीनदोस्त

Arambol Demolition Drive: हरमल येथे गिरकरवाडा परिसरातील बेकायदेशीर बांधकामांविषयीचे प्रकरण मागच्या वर्षी न्यायालयात पोहोचले होते.
Arambol Demolition Drive
Arambol DemolitionDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : समुद्रकिनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधकामे केली जातात. हरमल समुद्रकिनारी भागात अशाप्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकूण २१६ बांधकामांपैकी नऊ बांधकामे यावेळी मोडली गेली.

हरमल येथे गिरकरवाडा परिसरातील बेकायदेशीर बांधकामांविषयीचे प्रकरण मागच्या वर्षी न्यायालयात पोहोचले होते. त्यावेळी बर्नार्ड फर्नांडिस हे सरपंच होते. या बेकायदेशीर बांधकामांविषयी उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेत सरपंचांच्या नातेवाईकासहित इतर कोणकोणती बांधकामे बेकायदेशीरपणे उभारली गेली त्या सर्व बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Arambol Demolition Drive
Goa Politics: शीशे के घरों में रहने वाले...; 20 लाखांच्या लाच आरोपावरुन मंत्री माविन यांचा मडकईकरांना सूचक इशारा

त्यानुसार एकूण २१६ बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार सध्या पेडणे मामलेदार, पेडणे गट विकास कार्यालयामार्फत ही बांधकडो पाडण्याचे काम सुरू झाले आहे.

'त्यांच्या'वर कारवाई कधी?

हरमल, केरी, तेरेखोल, मांद्रे, मोरजी या किनारी भागात मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीयांनी भाडेपट्टीवर जमिनी घेऊन स्थानिक पंचायती किंवा सीआरझेड विभागाचा परवाना नसताना मोठमोठी बांधकामे केली आहेत.

गेल्यावर्षी न्यायालयाने 'सुमोटो' याचिका दाखल करून काही बांधकामे मोडण्याचे आदेश दिले होते. त्यातील हरमल परिसरातील काही बांधकामे मोडली. परंतु बिगर गोमंतकीयांनी केलेली बांधकामे त्याच ठिकाणी आहेत. त्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com