Panjim News: खाडीतील पाणीसुद्धा गटारांतून रस्‍त्‍यावर; पाटो परिसराची डोकेदुखी

Patto Issues: साचणाऱ्या पाण्‍यामुळे इमारतींना धोका; तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी
Patto Issues: साचणाऱ्या पाण्‍यामुळे इमारतींना धोका; तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी
Panjim Patto Stagnant Water Dainik Gomantak
Published on
Updated on

राजधानी पणजी ‘स्मार्ट सिटी’ होणार असली तरी भविष्‍यात नव्याने समस्या उद्‍भवणार नाहीत, असे मुळीच नाही. ‘करायला गेले एक आणि झाले भलतेच’ असा प्रकार सध्‍या रुअ दि ओरेम खाडीच्या किनाऱ्यावर दिसून येऊ लागला आहे. पावसाळ्यात पाटो परिसरात पाणी साचण्याची समस्या काही नवी नाही. या पाण्‍यामुळे तेथील इमारतींना धोका पोहोचू शकतो. या शहराला भविष्यातही काही समस्या सतावणारच आहेत.

पणजीतील पाटो हा परिसर आर्थिक विकास महामंडळाने तयार केलेले एक महत्त्‍वपूर्ण व्यावसायिक क्षेत्र. दलदलीचा परिसर म्हणून याकडे पाहिले जात होते. परंतु या ठिकाणी भराव टाकून कार्पोरेट कार्यालयांसाठी जागा निर्माण केली गेली. देशातील नामवंत कंपन्यांनी या ठिकाणी बहुमजली इमारती उभारल्या आणि सध्‍याही उभारल्या जात आहेत. परंतु मळ्यात साचत असलेल्‍या पावसाच्‍या पाण्‍याचा उपसा करून ते शेजारील रुअ दी ओरेम खाडीत सोडले जाते.

सदर खाडी मांडवी नदीला मिळत असल्याने फुगवट्यावेळी खाडीतील पाण्याची पातळी वाढते. जोरदार पावसामुळे मळ्यात यापूर्वी पाणी साचत होते, पूरसदृश्‍य स्थिती निर्माण होत असे. परंतु ते पाणी आता पंपाद्वारे खाडीत सोडले जात असल्यामुळे समस्‍या थोडी कमी झाली आहे. मात्र पाण्याचा फुगवटा आता विरुद्ध म्हणजे पाटोवरील खाडीत वाढत असल्याने तेथील गटारातून पाणी रस्त्यावर येते. त्याचा परिणाम पाणी साचण्यावर होतो.

आल्तिनोची टेकडी किती मजबूत?

पणजी ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. परंतु पुढे समस्या राहणारच नाहीत, असेही नाही. पणजीतील अल्तिनो टेकडीवर आणि उतरणीवर बांधलेली घरे, तेथे मुरणारे पाणी, घरांच्या पायाखालील लाल माती त्यामुळे हा भाग कधीही जागा सोडेल याची शाश्‍वती नाही.

अनेक ठिकाणी संरक्षक भिंती असल्या तरी निसर्गापुढे कितीही मजबूत बांधकाम उभे राहीलच असे नाही. यापूर्वी अनेक अभ्यासकांनी आल्तिनो हा ‘हॉट स्पॉट'' असल्याचे म्हटले आहे. येथील घरे, निर्माण झालेली बांधकामे किंवा अशा कामांना नव्याने परवानगी देताना सरकार दरबारी भविष्यातील धोक्याचा विचार होणे आवश्‍यक आहे.

Patto Issues: साचणाऱ्या पाण्‍यामुळे इमारतींना धोका; तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी
Patto-Panaji Construction : बिल्‍डरचा पराक्रम! पाटो रस्‍त्‍यावर आणखी 2 कार्यालये

पार्किंग समस्या व वाहतूक कोंडी

पणजी ही राज्याची राजधानी असल्याने शनिवार-रविवारची सुटी सोडल्यास इतर दिवशी शहरात दररोज दहा हजारांवर वाहने ये-जा करतात, असा अंदात वाहतूक पोलिस विभागानेच यापूर्वी वर्तविला आहे. ही वाहने कामानिमित्त येणाऱ्यांची व पर्यटनाला आलेल्या पर्यटकांची असतात. त्यामुळे एवढ्या वाहनांचा ताण शहरातील रस्त्यांवर आठवड्यातून पाच दिवस तरी असतो.

शिवाय वाहनांची वाढती संख्या आणि उपलब्ध पार्किंग जागा ही एक मोठी समस्या बनणार आहे. शहरातील अनेक इमारतींना, तारांकित हॉटेल्सना स्वतःचे पार्किंग नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची वाहनेही रस्त्यांवरच उभी राहतात. निवासी इमारतींतील नागरिकांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून मध्यवर्ती ठिकाणी पार्किंग इमारत उभारणे गरजेचे बनणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com