COVID-19 Goa: एका दिवसात 75 तर मे महिन्यात 636 जणांचा मृत्यू

COVID-19 Goa State records 75 deaths in one day
COVID-19 Goa State records 75 deaths in one day

पणजी: गोव्यात(Goa) कोरोनामुळे(Covid-19) मरण(Death) पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल तब्बल 75 व्यक्तींचा कोरोनामुळे गेला. गेल्या 11 दिवसात कोरोनाने 636 जणांचे प्राण घेतले आहेत.(COVID-19 Goa State records 75 deaths in one day)

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला असून काही ठिकाणी अपुऱ्या ऑक्सिजनमुळे नागरिकांना त्रासही सहन करावा लागत आहे. सध्याच्या घडीला ऑक्सिजन ही महत्वाची बाब झालेली असताना, काल मंगळवारी अचानक दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ऑक्सिजनच्या टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत एक कामगार  जखमी झाल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे सरकारी पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य खाते अपयशी ठरल्याचा आरोप करून आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे खुद्द आरोग्यमंत्री संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत.  या सर्व गोंधळात कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास अडचणी येऊन कोरोना बळींची संख्या बेसुमार वाढत आहे.

कल पर्यंतचे एका दिवसातील सर्वात जास्त 75 कोरोनाबाधितांचा मृत्यू  झाला आहे. सलग  पंधराव्या दिवशी दोन हजारपेक्षा जास्त कोरोना बाधित सापडले आहेत. मागिल 11 दिवसांत तब्बल 636 व्यक्तींना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यावरून राज्यात कोरोना हाताबाहेर गेलाय हे स्पष्ट झाले आहे. आणि त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण असून विरोधकांनी सरकारवर असंवेदनशील झाल्याचा आरोप केला आहे. 

कोरोनावर उपचार घेणाऱ्या 75 व्यक्तींचे निधन झाल्याने गोव्याने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. गोव्यात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 32836 वर पोचली असून कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी 70 ट्कक्यांच्या खाली पोचली आहे. सरकारचा हलगर्जीपणामुळे मंगळवारी एका दिवसात 75 कोरोना रुग्णांचा बळी गेला असे म्हणण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com