Panaji News : आपत्ती व्यवस्थापनासाठी नियंत्रण कक्ष : मुख्यमंत्र्यांची माहिती

Panaji News : आपत्ती व्यवस्थापनातर्फे पुढील यंत्रणांची तयारी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये मोपा व दाबोळी येथे विमानतळ आपत्कालीन प्रतिसाद आराखडा तयार केला असून त्यामुळे विमानतळावरील स्थिती कळेल.
cm pramod sawant
cm pramod sawantDainik Gomantak

Panaji News :

पणजी, पावसाळ्यात आपत्तीसंदर्भात वेळोवेळी माहिती देणारा ‘सचेत’ पोर्टल ॲप तसेच राष्ट्रीय आपत्ती सतर्कता पोर्टल किंवा मोबाईल ॲप प्रत्येकाने डाऊनलोड करावा. आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्हा व तालुकावार नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

आपत्तीची पूर्व चेतावणी प्रसार प्रणाली यंत्रणा (ईडब्ल्यूडीएस) ही बीएसएनएलच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी होत आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मॉन्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाची आज बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पर्वरी येथील सचिवालयात राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध खात्याचे प्रमुख, नौदल, रेल्वे, तटरक्षक, बीएसएनएल यांचेही अधिकारी उपस्थित होते.

झाडे व फांद्या तोडण्यासाठी निधी

आपत्ती व्यवस्थापनातर्फे पुढील यंत्रणांची तयारी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये मोपा व दाबोळी येथे विमानतळ आपत्कालीन प्रतिसाद आराखडा तयार केला असून त्यामुळे विमानतळावरील स्थिती कळेल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी (एनडीएमए) समन्वय साधून आपत्कालीन प्रतिसाद मदत सिस्टीम तयार ठेवण्यात आली आहे. त्यासाठी विदेशातील आपत्ती व्यवस्थापनातर्फे वापरण्यात येणाऱ्या उपकरणांबाबत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. रस्त्यावर किंवा वीजवाहिन्यांवर लोंबकळणारी झाडे वा फांद्या तोडण्यास महापालिकेला १ लाख, पालिकांना ५० हजार, तर पंचायतींना २५ हजारांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आला आहे.

cm pramod sawant
Goa Disaster Management: 'सचेत' मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण : मुख्यमंत्री

चिरेखाणीत पोहण्यास न जाण्याचे आवाहन

बंद असलेल्या खाणीच्या व चिरेखाणीच्या खंदकांमध्ये पावसाळ्यात पाणी भरत असल्याने सभोवती कुंपण घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या खंदकांमध्ये पोहण्यास न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व धबधब्यांवर सतर्कतेचे सूचना फलक लावले जाणार आहेत. धबधब्यांवर निर्बंध नसले, तरी तेथे जाताना पालकांनी मुलांना धोक्याची सूचना द्यावी. वीज व स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

स्मार्ट सिटीची कामे पूर्णत्वाकडे

राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीची ९० ते ९५ टक्के कामे पूर्ण होत आली आहेत. येत्या दोन दिवसांत नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज हे महापौरांसोबत झालेल्या कामांचा आढावा घेतील. जी लहानसहान कामे उरली आहेत ती सुद्धा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करतील. हल्लीच झालेल्या अवकाळी पावसात राज्यातील कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले. नुकसानीचा सविस्तर अहवाल अजून यायचा आहे, असे त्यांनी सांगितले.

११ बहुउद्देशीय वादळी निवारा केंद्रे

ओएनजीसी या संस्थेतर्फे बेतुल येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी आपत्ती ओढवल्यास तेथील लोकांना स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी ११ बहुउद्देशीय वादळी निवारा केंद्र वेगवेगळ्या तालुक्यात स्थापन करण्यात आली आहेत. प्रशिक्षित असलेले सरकारकडे ४०० आपदा मित्र आहेत, त्यांचा या कामाला वापर केला जाणार आहे. ज्या भागात पूरग्रस्त स्थिती तसेच दरडी कोसळण्याची शक्यता आहे, ती क्षेत्रे पाहण्यात आलेली आहेत. गटारातील व नद्यांमधील गाळ उपसण्यासंदर्भात संबंधित खात्यांना सूचना केलेल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com