Goa Loksabha 2024: फ्रान्‍सिस सार्दिन यांनी वाचला कामाचा पाढा; म्हणाले... 'दक्षिणेत काँग्रेसचा विजय निश्‍चित'

Goa Loksabha 2024: पूर्वीचे भाजप खासदार नरेंद्र सावईकर यांनी खर्च न करता शिल्‍लक ठेवलेले २.६० कोटी रुपयेही खर्च केले - फ्रान्‍सिस सार्दिन
Goa Loksabha 2024 | francisco sardinha
Goa Loksabha 2024 | francisco sardinhaDainik Gomantak

Goa Loksabha 2024 francisco sardinha

मडगाव, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कुठलेही पक्ष रिंगणात उतरले तरी काँग्रेस पक्षाचा विजय ते रोखून ठेवू शकणार नाहीत.

मागच्‍या वेळीही हे सर्व पक्ष रिंगणात होते तरी दक्षिण गोव्‍यातून काँग्रेसचाच विजयी झाला होता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया दक्षिण गोव्‍याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी व्‍यक्‍त केली.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना सार्दिन यांनी काँग्रेस पक्षाने पुन्‍हा एकदा आपल्‍याला उमेदवारी दिल्‍यास दक्षिण गोव्‍यातून निवडून येण्‍यास आपण सक्षम आहे, असे मत व्‍यक्‍त केले. खासदार निधीतून मी दक्षिण गोव्‍यात २० काेटींची कामे मार्गी लावली आहेत.

मी माझा सर्व निधी खर्च केला आहे. त्‍याशिवाय पूर्वीचे भाजप खासदार नरेंद्र सावईकर यांनी खर्च न करता शिल्‍लक ठेवलेले २.६० कोटी रुपयेही खर्च केले. त्‍यात दक्षिण गोव्‍यातील कित्‍येक शाळांना संगणक आणि लॅपटॉप, पाच ठिकाणी खेळण्‍यासाठी मैदाने, पाच ठिकाणी दफनभूमी याशिवाय आणखी कित्‍येक कामे मी केली आहेत.

मतदार साथ देतील

यावेळी काँग्रेसकडे दक्षिण गोव्‍यात केवळ दोन आमदार शिल्‍लक राहिले आहेत, याकडे सार्दिन यांचे लक्ष वेधले असता, काँग्रेसचे आमदार जरी भाजपने विकत नेले असले तरी मतदारांना ते विकत घेऊ शकणार नाहीत.

दक्षिण गोव्‍यातील मतदार हा परंपरेने काँग्रेस पक्षाशी जोडला गेलेला आहे. त्‍यामुळे यावेळीही हा मतदार काँग्रेसबरोबर राहील याची मला खात्री आहे, असे ते म्‍हणाले.

या कामांमुळेच मला लोक पुन्‍हा निवडून देतील याची मला खात्री आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. गोमन्‍तकचे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या फेसबूक तसेच यू-ट्यूबवर ही मुलाखत लोकांसाठी उपलब्‍ध आहे.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करून इंडिया आघाडी स्‍थापन केलेल्‍या आघाडीत सामील असलेल्‍या आम आदमी पार्टीकडून दक्षिण गोव्‍यासाठी बाणावलीचे आमदार व्हेन्‍झी व्‍हिएगस यांचे नाव उमेदवार म्‍हणून जाहीर केले आहे.

यासंदर्भात सार्दिन यांना विचारले असता, या देशातून भ्रष्‍टाचारी आणि धार्मिक विद्वेश पसरविणारे भाजप सरकार हद्दपार व्‍हावे ही काँग्रेसबरोबरच ‘आप’चीही इच्‍छा आहे. त्‍यामुळे दोन्‍ही पक्ष गंभीरपणे या युतीकडे पाहात आहेत.

गोव्‍यातील जागा वाटपाबद्दल केंद्रीय स्‍तरावर बोलणी चालू आहेत. ‘आप’सोबत युती कायम राहावी ही माझी वैयक्‍तिक इच्‍छाही आहे. असे जरी असले तरी यदाकदाचित उद्या हे पक्ष रिंगणात उभे राहिले तरी त्‍याचा मोठा परिणाम दक्षिण गोव्‍यात काँग्रेसवर होणार नाही. मागच्‍यावेळीही हे पक्ष होते; पण त्‍यांना काहीच प्रभाव पाडता आला नव्‍हता.

- फ्रान्‍सिस सार्दिन, खासदार, दक्षिण गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com