Sanjay Barde : प्रवीण आर्लेकरविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवा; कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा

आर्लेकर यांच्या विरोधात तक्रार न नोंदवून घेतल्यास पेडणे पोलिस ठाण्यात उपोषणाला बसेन, असा इशारा बर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
Sanjay Barde : प्रवीण आर्लेकरविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवा; कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा
Published on
Updated on

Pernem : निवडणूक आयोगाला खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी पेडणे मतदार संघात निवडणूक निवडून आलेले प्रवीण आर्लेकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी आज पेडणे पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक वायंगणकर यांना निवेदन सादर करून केली. पेडणे पोलिसांनी आर्लेकर यांच्या विरोधात तक्रार न नोंदवून घेतल्यास पेडणे पोलिस ठाण्यात उपोषणाला बसेन, असा इशारा बर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

बर्डे म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रवीण आर्लेकर यांनी निवडणूक आयोगाला स्वतःची जमीन न दाखवता दुसऱ्याची जमीन आपल्या नावे दाखवून खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत.

Sanjay Barde : प्रवीण आर्लेकरविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवा; कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा
Pernem News : कामुर्ली-तुये फेरीबोट धक्क्याचे काम बंदच

या संबंधी आम्ही निवडणूक आयोगाला कारवाईची मागणी केली तेव्हा निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. लाखो रुपये खर्चून निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. आयोगाचे अधिकारी याबाबतीत न्यायालयात जाण्याचा सल्ला देतात, म्हणजे ते या पदावर कशासाठी आहेत, अशी विचारणाही बर्डे यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com