Social Media : सोशल मीडियामुळे मुलांमध्ये संभ्रम..! डॉ. सलील कुलकर्णी

Social Media : मुलांवर कसलीही सक्ती न करता त्यांना आपल्या पसंतीचा पर्याय निवडू द्या, असे आवाहन प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी सांगितले.
Dr. Salil Kulkarni
Dr. Salil KulkarniDainik Gomantak
Published on
Updated on

Social Media :

सासष्टी, पूर्वी मुलांवर पालक, नंतर शिक्षक आणि मित्र संस्कार करीत; पण आता सोशल मीडिया हा त्यांच्यासमोर पर्याय असल्याने त्यांना नेमके कोण संस्कार करतात, हे कळणे कठीण झाले आहे.

त्यामुळे पालक किंवा शिक्षकांना जे सांगायचे असते, त्यापूर्वीच त्यांना ते समजलेले असते. मुलांवर कसलीही सक्ती न करता त्यांना आपल्या पसंतीचा पर्याय निवडू द्या, असे आवाहन प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी सांगितले.

कोकणी भाषा मंडळ, कला व संस्कृती संचालनालय, एससीईआरटी तसेच रवींद्र भवन, मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या बाल साहित्य परिषदेत ते ‘बालमनातील कलाकार व रसिक’ या विषयावर बोलत होते.

Dr. Salil Kulkarni
Goa Mine: खोट्या ईआयए अहवालाविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार; 'खाण ब्लॉकसाठीची जनसुनावणी रद्द करा'- ग्रामस्थांची मागणी

कुलकर्णी म्हणाले की, मुलांवर सक्ती न करता त्यांना व्यक्त होण्याची संधी द्या. सध्याच्या युगात प्रत्येक शिक्षक हा पालक आणि पालक हा शिक्षक असतो. मुले पालकांपेक्षा शिक्षकांसोबत जास्त वेळ घालवतात.

त्यामुळे पालकांनीही केवळ शिक्षकांवरच मुलांची जबाबदारी टाकणे योग्य नाही. पालक-शिक्षकांनी मुलांचे, विद्यार्थ्यांचे इतरांसमोर कौतुक करावे. त्यांची बाजू घ्यावी. इतरांसमोर त्यांना वाईट वाटेल असे बोलू नये, असा सल्लाही डॉ. कुलकर्णी यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com