शिवोली: कळंगुटचे (Calangute) माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य फ्रांन्सिसको रॉड्रीगीश यांच्या विरोधात कळंगुट फोरमच्या कार्यकर्तै स्वप्नेश वायगणकर यांना शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल स्थानिक पोलिसांत (Police) रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारीच्या प्रती उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात पाठवून देण्यात आल्याची माहिती यावेळी फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर यांनी दिली. (Complaint in a threatening case against Francisco Rodriguez)
तक्रारदार स्वप्नेश वायंगणकर हे कळंगुट फोरम या स्वयंसेवी संसंस्थेचे उमदें तरुण कार्यकर्ते असून कोवीड महामारीच्या काळात त्यांनी कळंगुटातील लोकांसाठी दखल घेण्यायोग्य सेवा बजावल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. कळंगुटचे माजी सरपंच तिवायवाडा -कळंगुटच्या प्रभाग क्र : 7चे पंचसदस्य असलेल्या रॉड्रीगीश यांनी शनिवारी दुपारी अडीच वाजता वांयगणकर यांच्या घरी जाऊन व्रूद्ध आई वडिलांसमोर त्यांना शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, तक्रारीची दखल घेत कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ याबाबतीत तपास करीत आहेत. तक्रार दाखल करण्यासाठी कळंगुटच्या पोलिस स्थानकात कळंगुट फोरमचे स्व्पनेश वायंगणकर, सोबत प्रेमानंद दीवकर हे उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.