Goa Coconut Price: गोव्यात नारळ महागले! मोठ्या प्रमाणात शहाळ्यांचा तुटवडा; लग्नसमारंभ, कार्यक्रमांमुळे वाढली मागणी

Goa Coconut Rates: शहाळ्यांची दर ५० ते ६० रुपये असून मागील दोन-तीन महिन्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात शहाळ्यांचा तुटवडा भासत आहे.
Goa Coconut Price
Goa Coconut RatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सर्वसामान्यपणे मध्यम आकाराचा नारळ ४० ते ५० रुपयांना एक या दराने विकला जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभास नारळ मोठ्या प्रमाणात लागतात. त्यासोबतच, हॉटेल व्यावसायिक, विविध कार्यक्रमाच्या जेवणाचे ऑर्डर घेणाऱ्या व्यावसायिकांना नारळ लागतात.

परंतु चांगल्याप्रतीचे तसेच योग्य दरात नारळ मिळविण्यासाठी त्यांनाही खटपट करावी लागत आहे. नारळाला मागणी आहे परंतु जेवढी मागणी आहे त्यातुलनेत उत्पादन कमी असल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे.

नारळाचे पाणी हे शरीराला गारवा मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात प्यायले जाते, परंतु सध्या राज्यात नारळाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नारळाचे दर ऐकताच सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना घाम फुटत असल्याचे चित्र आहे. शहाळ्यांची दर ५० ते ६० रुपये असून मागील दोन-तीन महिन्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात शहाळ्यांचा तुटवडा भासत आहे.

Goa Coconut Price
Coconut Price: 'नारळ' अजूनय म्हारगलो! मार्च अखेरीपर्यंत भडका राहणार कायम

नारळाचे पीक कमी असल्याने यंदा गावठी खोबरेल तेलाचाही तुटवडा जाणवत आहे. घरात दररोजच्या वापरासाठीच सध्या नारळ मिळणे कठीण झाले असल्याने सुक्या नारळांपासून खोबरेल तेल काढण्यासाठी नारळच नाहीत. जे नागरिक काही प्रमाणात तेल काढत आहेत त्यांना देखील कामगार, मेहनत व इतर खर्च आदी पाहता दरात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ करून विक्री करावी लागत आहे.

Goa Coconut Price
Coconut Price: नारळ अजून महागलेलाच! तुटवड्यामुळे दरात वाढ; माकडांचा उपद्रव वाढल्याने बागायतदार हैराण

खोबरेल तेलही महागले!

गेल्यावर्षी १ लिटर गावठी खोबरेल तेलाची बाटली २०० ते २५० रुपयांना विक्री केली जात होती, ती ययंदा ३०० रुपये प्रती लिटर दराने तेल विकली जात आहे. काही ठिकाणी फिल्टर केलेल्या शुद्ध खोबरेल तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त खोबरेल तेल विकले जात आहे. गावठी खोबरेल तेलाच्या नावाखाली कमी दरात तेल विकले जात असून खोबरेल तेलाची जाण नसलेले ग्राहक त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com