Coconut Rate : भाव वधारले; पण उत्पादन घटले; नारळाला खेतींचा उपद्रव

Coconut Rate : हवामान बदलाचा परिणाम, लाल तोंडाच्या माकडांकडून (खेती) आणि उंदरांकडून नारळाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Coconut Tree
Coconut TreeDainik Gomantak

सुभाष महाले

Coconut Rate :

काणकोण, राज्यात नारळ भाव खाऊ लागला आहे; पण दुसऱ्या बाजूला नारळाचे उत्पादन बरेच घटले आहे. याला कारणे अनेक आहेत.

हवामान बदलाचा परिणाम, लाल तोंडाच्या माकडांकडून (खेती) आणि उंदरांकडून नारळाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ग्रामीण भागातील बागायतींमधील नारळ खेतींकडून फस्त केले जातात. त्यामुळे दर तीन महिन्यांनी काढणीवेळी नारळ मिळणे कठीण झाले आहे. काणकोण तालुक्यात पैंगीण व लोलये पंचायत क्षेत्रात मोठ्या नारळ बागायती आहेत. मात्र, या बागायतींना खेतींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत असल्याने सणासुदीला शेतकऱ्यांना नारळ विकत आणून खावे लागतात, असे लोलये येथील मनोज शिरोडकर

यांनी सांगितले. गोव्यामध्ये नारळ लागवडीखालील एकूण क्षेत्र २६,३०७ हेक्टर अाहे.

Coconut Tree
Goa News : जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष; कुठ्ठाळीच्या जाहीर सभेत युरी आलेमांव यांचे भाजपवर टीकास्त्र

काणकोणातील बागायती पिके

नारळ लागवड १५० हेक्टर

काजू लागवड ३,५०० हेक्टर

ऊस लागवड ६० हेक्टर

केळी लागवड १५० हेक्टर

आंबा लागवड ५०० हेक्टर

सुपारी लागवड ५० हेक्टर

राज्यात नारळ उत्पादनात घट झाली आहे. त्याला माईट रोग व खेतींचा उपद्रव कारणीभूत आहे. नारळ पक्व होण्यापूर्वीच खेती खाऊन फस्त करतात. माईट रोगाची लागण झाल्याने कच्चे नारळ गळून पडतात. गळून पडलेले नारळ या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी जाळून टाकणे योग्य ठरते.

- नागेश कोमरपंत, साहाय्यक कृषी संचालक.

दर ४० रुपयांपर्यंत वाढले

सध्या नारळाच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गोवा बागायतदार संस्थेच्या नारळ खरेदीचा दर नारळ रास १० हजार ते १६ हजार, ८० भरतीचा नारळ २५ हजार रुपये, ९० भरतीचा नारळ २३ हजार रुपये,

१०० भरतीचा नारळ २१ हजार रुपये, १२० भरतीचा नारळ १९ हजार रुपये, १८० भरतीचा नारळ १५ हजार रुपये, २५० भरतीचा नारळ ११ हजार रुपये असा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com