Bicholim: बाजारात 'नारळ' खातोय भाव, चतुर्थीत शंभरीवर जाण्याची शक्यता; ग्राहक चिंतेत

Rising coconut prices in Goa: नारळ आता पुन्हा महाग झाल्याने सामान्य ग्राहकांच्या कपाळाला आठ्या पडू लागल्या आहेत.
Goa Coconut  Price
Goa Coconut Price Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: दैनंदिन आहारातील मुख्य घटक आणि धार्मिक कार्यात महत्त्व असलेला नारळ आता पुन्हा महाग झाल्याने सामान्य ग्राहकांच्या कपाळाला आठ्या पडू लागल्या आहेत.

नारळांचा तुटवडा आणि सध्याची दरवाढ पाहता भर चतुर्थीत नारळ शंभरीवर पोचण्याची शक्यता वाढली आहे. तसे संकेतही डिचोलीच्या बाजारातील विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या नारळांच्या दरात प्रतिनगामागे १० ते १५ रुपये अशी वाढ झाली आहे.

डिचोलीच्या बाजारात मोठ्यात मोठ्या नारळांचे दर सध्या प्रतिनग ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर मध्यम आकाराचे नारळ प्रतिनग ४० ते ५० रुपये या दराने विकण्यात येत आहेत. नारळांचे दर वाढल्याने आधीच महागाईमुळे त्रस्त झालेली सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.

Goa Coconut  Price
Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

नारळ महाग झाल्याने खरेदीवरही परिणाम झाला आहे, अशी खंत जयंती वायंगणकर, दीपक पळ आदी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून रोग आदी प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. यावर्षी मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा नारळ उत्पादनात जवळपास ४० टक्के घट झाली आहे, अशी माहिती बागायतदारांकडून मिळाली आहे.

तापमानात झालेली वाढ, त्यातच पावसाच्या माऱ्यामुळे नारळांच्या पिकावर परिणाम झाला आहे. त्यातच खेत्यांसह शेकरे आदी रानटी प्राण्यांचा उपद्रवही वाढलेला आहे. ‘शेकरे’ जातीचा प्राणी धरलेले नारळ माडावरच खाऊन टाकतात, अशी माहिती काही बागायतदारांनी दिली. सध्या माडांवर नारळ कमी आहेत. त्यातच पावसामुळे चतुर्थीवेळी ते नारळ काढायला मिळतील की नाही, त्याबद्दल साशंकता आहे.

Goa Coconut  Price
Goa Panchayat Workers: सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा पंचायत कर्मचारी संपावर; 'आयटक'चा इशारा

मागणी असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात शहाळी विक्रीस येतात. शहाळ्यांना भावही चांगला आहे. शहाळ्यांमुळे स्थानिक बागायतीतील नारळ उत्पादन घटत आहे, असा एक समज आहे. मात्र, हा समज चुकीचा आहे. क्वचित अपवाद सोडल्यास बाजारात कर्नाटक आणि अन्य राज्यांतून शहाळ्यांची आवक होत असते. त्यामुळे स्थानिक नारळ उत्पादन घटले, असे म्हणता येणार नाही. असंतुलित हवामान आणि रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे नारळांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे सध्या नारळ भाव खात आहेत. - श्रीकांत जांभळे, बागायतदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com