महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! मुख्यमंत्री सावंत, मंत्री विश्वजीत राणेंचा 95 चा स्ट्राईक रेट

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील प्रचारासाठी गोव्यातून भाजपच्यावतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे गेले होते.
Devendra Fadnavis, Vishwajit Rane
Devendra Fadnavis, Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024

पणजी: महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील प्रचारासाठी गोव्यातून भाजपच्यावतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे गेले होते. प्राप्त माहितीनुसार, ज्या-ज्या मतदारसंघात त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला, त्यात सावंत यांनी २२ पैकी २१ आणि राणे यांनी प्रचार केलेल्या १२ पैकी ११ ठिकाणचे उमेदवार निवडून आले आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रातील चंदगड (कोल्हापूर), राजापूर लांजा, अक्कलकोट, सोलापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, सांगली, जत, पलूस कडेगाव, दक्षिण कराड, सातारा, चिंचवड, पुणे, नांदेड, लातूर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, अकोला, हातकणंगले, इचलकरंजी, हुपरी याठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.

त्यात त्यांनी प्रचार फेरी, त्याशिवाय सभाही घेतल्या. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पलूस-कडेगाव याठिकाणी विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजप उमेदवारांसाठी केलेला प्रचार प्रभाव पाडू शकला नाही, असे दिसून आले. माजी मंत्री पतंगराव कदम यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सुपूत्र विश्वजित कदम हेच या मतदारसंघातून २०१८, २०१९ व २०२४ असे सलग तीनवेळा निवडून आले आहेत.

एक मतदारसंघ वगळता भाजपच्या उमेदवारांसाठी सावंत यांनी केलेला प्रचार लाभदायी ठरला असल्याचे दिसून येते. सांगली मतदारसंघात त्यांनी भाजपच्या गाडगीळांसाठी प्रचार केला, तेथे सावंत प्रभावी ठरल्याचे दिसते.

Devendra Fadnavis, Vishwajit Rane
Goa Bank Fraud: गोव्यात हातचलाखी करून खातेदारांना लाखोंची टोपी! महिला बँक कर्मचाऱ्यास अटक; पोलिस निरीक्षकाची तपासात हलगर्जी

राणेंकडून १२ जणांचा प्रचार; ११ विजय

मंत्री विश्वजित राणे यांनी कोकणातील मतदारसंघात महायुतीच्या १२ उमेदवारांचा प्रचार केला, त्यात ११ उमेदवार निवडून आले आहेत. राणे यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघांमध्ये पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहाघर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे प्रचार केला. गुहागर येथील महायुतीचा उमेदवार पराभूत झाला. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनीही महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता आणि तेथील उमेदवारही निवडून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com