नोकरीसाठी पैसे मागितल्या प्रकरणी दोघांना अटक

पोलिस खात्यात सध्या भरती प्रक्रिया सुरू असून त्यात उपनिरीक्षकांसह अन्य विविध पदांचा समावेश आहे.
Both arrested for soliciting money for police jobs in goa
Both arrested for soliciting money for police jobs in goa Dainik Gomantak

फोंडा: पोलिस खात्यात उपनिरीक्षकपदाच्या नोकरीसाठी वीस लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी काल रात्री दोन सरकारी नोकरांना अटक केली. पोलिस खात्यात सध्या भरती प्रक्रिया सुरू असून त्यात उपनिरीक्षकांसह अन्य विविध पदांचा समावेश आहे.

(Both arrested for soliciting money for jobs in goa)

Both arrested for soliciting money for police jobs in goa
ओंडक्यांमुळे पूल बनला असुरक्षित

या पोलिस खात्यातील नोकर भरतीप्रकरणी फोंड्यातील एका युवकाकडून उपनिरीक्षकपदासाठी निवड करू असे सांगून लाच मागितल्याप्रकरणी संशयित सचिन पोकळे (ढवळी - फोंडा) व पंकज फडते (मोरजी) या दोघांनाही अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनिरीक्षकपदाच्या भरती यादीत नावाची निश्‍चिती करण्यासाठी वीस लाख रुपयांची मागणी सचिन पोकळे व पंकज फडते या दोघांनीही केली होती. सचिन पोकळे हा अपनाघरमध्ये तर पंकज फडते हा पर्वरी सचिवालयात कामाला आहे. वीस लाख रुपयांची मागणी केल्यानंतर त्यात काळेबेरे असल्याचे लक्षात आल्यावर ज्या युवकाकडून पैसे मागितले होते, त्या युवकाच्या बहिणीने लगेच फोंडा पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली.


या तक्रारीनुसार फोंडा पोलिसांनी संशयित सचिन व पंकज या दोघांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक नारायण पिंगे हे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com