Goa Politics: मुख्यमंत्री, तानावडे व सभापती दिल्लीत, चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाचा मात्र इन्कार

Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यापाठोपाठ सभापती रमेश तवडकर आज दिल्लीत दाखल झाले. तेथे सदानंद शेट तानावडेही होते. त्यामुळे आज दुपारनंतर राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी जोरात चर्चा सुरू झाली, परंतु तूर्त मंत्रिमंडळ फेरबदल नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
CM Pramod Sawant, Ramesh Tawadkar
CM Pramod Sawant, Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant Ramesh Tawadkar Delhi Visit

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यापाठोपाठ सभापती रमेश तवडकर आज दिल्लीत दाखल झाले. तेथे सदानंद शेट तानावडेही होते. त्यामुळे आज दुपारनंतर राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी जोरात चर्चा सुरू झाली, परंतु तूर्त मंत्रिमंडळ फेरबदल नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या मुलीच्या स्वागत समारंभासाठी मुख्यमंत्री व सभापती दिल्लीत गेले आहेत. तानावडे राज्यसभा अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत होते. सायंकाळी मुख्यमंत्री व तानावडे एकत्रितपणे या समारंभाला गेले तर तवडकर नंतर तेथे पोचले.

गेले काही दिवस राज्यात अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. सभापती तवडकर व मंत्री गोविंद गावडे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. विरोधक आक्रमक झालेले आहेत. यामुळे गेले काही महिने लांबलेला मंत्रिमंडळ फेरबदल विषय भाजप पक्षश्रेष्ठी विचारात घेतील अशी राजकीय अटकळ आहे. ती खरी मानून राज्यभरात तशी चर्चा सुरू झाली होती.

केरळच्या दौऱ्यावर गेला आठवडाभर असलेले राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई उद्या (ता. २६) गोव्यात पोचत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात नव्या मंत्र्यांचा शपथविधीही होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. राजभवनावरील सूत्रांनी मात्र अशा समारंभाची सरकारकडून कोणतीही सूचना आलेली नाही असे सांगितले. मंत्रिमंडळ फेरबदलाआधी राज्यपालांना यादी सादर करावी लागते, त्यांची अनुमती घ्यावी लागते तो सोपस्कारही पूर्ण झालेला नाही, अशीही माहिती मिळाली आहे.

या चर्चेची गाज दिल्लीपर्यंत पोचली. तेथे अनेक भेटीत व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांना तूर्त मंत्रिमंडळ फेरबदल नाही, पक्षश्रेष्ठींना त्यासाठी वेळ नाही असे सांगावे लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधी विकसित गोवा २०४७ लक्ष्य गाठण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदल गरजेचा असल्याचे नमूद केले होते. सभापतींनीही जाहीरपणे मंत्र्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात भाजपचा अपेक्षित मताधिक्य देण्यातही काही मंत्री आमदारांना यश आले नव्हते. या साऱ्याचा संबंध मंत्रिमंडळ फेररचनेशी लावला जात होता. त्यातच मुख्यमंत्री, तानावडे व सभापती दिल्लीत एकाच दिवशी असल्याने या चर्चेला बळ मिळाले होते.

मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीला रवाना झाले. त्यांनी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील माहिती व प्रसिद्ध खात्याच्या दालनाला भेट दिली. तेथे गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कलाकारांशी संवाद साधला. केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जहाजोद्योग, बंदरे व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्‍याशी चर्चा केली. मुरगाव बंदर प्राधिकरण आणि राज्य सरकार यांच्यातील ताणतणावाच्या विषयांवर त्यांनी या भेटीदरम्यान चर्चा केली.

CM Pramod Sawant, Ramesh Tawadkar
Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

जहाजोद्योग मंत्र्यांशी चर्चा

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की केंद्रीय जहाजोद्योग मंत्र्यांशी मुरगाव बंदरातून आयात निर्यात वाढ व्हावी यावर चर्चा केली.त्यांनी आराखडा तयार झाल्यानंतर गोव्यात येऊन त्यावर चर्चा घडवून आणू असे आश्वासन दिले आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री हे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी होते, त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्याशी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा २०११ व २०१९ बाबत चर्चा केली. आमचे नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना बराच काळ मी भेटलो नव्हतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com