Goa GMC: डॉक्‍टरांची सुरक्षा आमच्‍यासाठी सर्वप्रथम, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये बदल करू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेऊन इस्पितळातील समस्या जाणून या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेऊन इस्पितळातील समस्या जाणून या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले
Pramod Sawant|GMCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षारक्षकांना रुग्णांच्या कुटुंबीयांशी कसे बोलावे, हे कळत नाही. कुटुंब सदस्य आधीच तणावामध्ये असतात आणि त्यांच्याशी उद्धटपणे वागले की त्यांना अजून राग येतो. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांशी कसे बोलावे आणि कसे वागावे याचे प्रशिक्षण सुरक्षारक्षकांना देणे अनिवार्य असल्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर करून डॉक्टरांनी इस्पितळातील विशेष घटनांवर प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, ‘आयएमए’चे गोवा अध्यक्ष डॉ. संदेश चोडणकर, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (गार्ड), गोवा पोलिस यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन इस्पितळातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि ते बदल आम्ही नक्की करू. १५ सप्टेंबरपूर्वी कायद्यात बदल करणारा अध्यादेश आम्ही जरी करू. डॉक्‍टरांनी आम्‍हाला वेळोवेळी बदल सुचविले तर आम्‍ही ते नक्‍की करू. डॉक्‍टरांची सुरक्षा आमच्‍यासाठी सर्वप्रथम आहे व त्‍यासाठी आम्‍ही कायद्यातदेखील दुरुस्‍ती करण्यास तयार आहोत.

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेऊन इस्पितळातील समस्या जाणून या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले
Goa GMC: कोलकाता अत्याचाराच्या घटनेनंतर गोवा सतर्क; गोमेकॉत टास्क फोर्सची स्थापना, ठरले पहिलेच राज्य..

‘गार्ड’च्या सूचना, मागण्या

‘गार्ड’चे (गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा यांनी गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांना परिचारकांकडून शाब्दिक आणि शारीरिक शोषणाबाबत येणाऱ्या सर्व समस्या सांगितल्या. तसेच सुरक्षेतील त्रुटींमुळे भविष्यात कोणतीही अनावश्यक घटना घडू नये यासाठी सूचनाही केल्या आहेत.

शर्मा यांनी सशस्त्र दलांच्या नियुक्तीसह कोड व्हायलेट आणि सुरक्षा ॲप तयार करण्याची कल्पना सुचविली आणि तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालय, मानसोपचार आणि मानवी वर्तणूक संस्था आणि गोव्यातील विविध सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये उशिरापर्यंत सर्व महिला डॉक्टरांना सोबत ठेवण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकांची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com