Goa Government| सावंत सरकार जनतेप्रती संवेदनशील

ॲड. यतीश नायक : सरकारकडून लोकहिताच्या योजना राबविणे सुरूच
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak

पणजी: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा गंभीर आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेले असतानाच आज भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सरकार जनतेप्रती संवेदनशील असून लोकहिताच्या योजना राबवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रवक्ते ॲड. यतीश नायक, संस्कृती सेलचे प्रमुख गोरख मांद्रेकर, महिला मोर्चाच्या अध्यक्ष भारती बांदोडकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर उपस्थित होते.

(cm pramod Sawant government sensitive towards people)

Goa CM Pramod Sawant
Goa Petrol Price| कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील इंधनाचे नवे दर जाहीर

ॲड. नायक म्हणाले, डॉ. प्रमोद सावंत सरकारकडून जनतेसाठी विविध प्रकारच्या सामाजिक कल्याणाच्या योजना राबवणे सुरू आहे. लोकहितासाठी सरकारने घेतलेले निर्णय हे सुनिश्चित आणि प्रगतिशील आहेत.

सरकारने सुरू केलेली स्टार्ट अप पॉलिसी, आयटी पॉलिसी आणि उद्योग पॉलिसी या राज्यात उद्योग वाढीसाठी, माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी पूरक व पुढे नेणाऱ्या आहेत. सरकारची प्रशासनावरची पकड घट्ट आहे. म्हणूनच सरकार बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करणाऱ्यांच्या विरोधात एसआयटीची स्थापना करू शकले.

Goa CM Pramod Sawant
Goa Agriculture| नैसर्गिक शेती उपक्रम लवकरच सुरू करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

या माध्यमातून अशाप्रकारच्या सर्व प्रकरणांची तपासणी व चौकशी सुरू आहे. याशिवाय या एसआयटीवर देखरेख ठेवण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य आयोगाची स्थापना केली आहे. हे सर्व राज्यातील सामान्य जनतेच्या हितासाठीच केले आहे.

‘सरकारचे दोन निर्णय महत्त्वाचे’

गोरख मांद्रेकर म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांत राज्य सरकारचे अत्यंत महत्त्वाकांक्षी असे दोन निर्णय लोकांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. त्यातील एक म्हणजे मोपा विमानतळावरील रन वे चाचणी. ही चाचणी यशस्वी झाल्याने मोपा विमानतळाच्या कामकाजाला वेग आला आहे. याशिवाय झुआरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या चौपदरी रस्त्याच्या पुलाचा शेवटचा भाग जोडला गेला आहे. हे दोन्हीही प्रकल्प राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com