Goa 12 th Result : गोव्यात बारावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींची बाजी

Goa 12 th Result : ८४.९९ टक्के : मात्र, गतवर्षीपेक्षा १० टक्के कमी
goa hsc result 2024
goa hsc result 2024 Dainik Gomantak

Goa 12 th Result :

पणजी, गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या २०२३-२४ सालच्या परीक्षेचा निकाल ८४.९९ टक्के लागला. त्यात १७,५११ पैकी १४,८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.०६ टक्के राहिली, तर ८१.५९ टक्के मुले उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात रात्री आठ वाजता शेट्ये यांनी निकाल जाहीर केला. शेट्ये म्हणाले, वाणिज्य शाखेत सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी नोंदली गेली आहे. या शाखेतील ९०.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील ८६.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर विज्ञान शाखेतील ८२.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यावसायिक शाखेतील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७६.४५ टक्के राहिले आहे.

योगायोगाने, गतवर्षी बारावीचा निकाल या वर्षाच्या तुलनेत १०.४७ टक्के म्हणजेच ९५.४६ टक्के इतका जास्त होता. यावर्षीचा उच्च माध्यमिक निकाल गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. कमी निकालाची संभाव्य कारणे मागील वर्षांतील परीक्षा पद्धतीत बदल असू शकतात. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यात अपयश, हेही कारण असू शकते.

goa hsc result 2024
Goa Accident Case : रस्‍ते अपघातांत वर्षाला सरासरी १०० तरुणांचा बळी

खासगी, आयटीआय आणि पुनर्परीक्षा देणाऱ्यांमध्ये अनुक्रमे १३८ पैकी १८, २१ पैकी १८ आणि ९ पैकी २ जण उत्तीर्ण झाले. त्याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याचे त्यांनी नमूद केले. त्यात १८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) परीक्षेत १०५१ विद्यार्थ्यांपैकी ८५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गुणांच्या पडताळणीसाठी २३ तारखेपासून ऑनलाईन पोर्टल खुले होईल. ते २६ एप्रिलपर्यंत खुले असेल. प्रत्येक विषयासाठी ३५० शुल्क आकारले जातील.

तालुकानिहाय निकाल

बार्देश ः ९०.९० टक्के (२,९९० पैकी २,७१८ उत्तीर्ण)

डिचोली ः ८७.७० टक्के (१,२४४ पैकी १,०९१ उत्तीर्ण)

धारबांदोडा ः ६३.४४ टक्के (१८६ पैकी ११८ उत्तीर्ण)

पेडणे ः ८१.११ टक्के (७०४ पैकी ५७१ उत्तीर्ण)

सासष्टी ः ८८.०९ टक्के (३,८७९ पैकी ३,४१७ उत्तीर्ण)

सत्तरी ः ६६.०६ टक्के (७६९ पैकी ५०८ उत्तीर्ण)

तिसवाडी ः ८८.६४ टक्के (२,२६३ पैकी २,००६ उत्तीर्ण)

फोंडा ः ७८.३२ टक्के (२,२१९ पैकी १,७३८ उत्तीर्ण)

सांगे ः ८९.७३ टक्के (१४६ पैकी १३१ उत्तीर्ण)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com