
City & Town Planning Department नगर व शहर नियोजन खात्यातील ग्रेड वन ड्राफ्ट्समन चंद्रशेखर तुयेकर (रा. तिसवाडी) यांच्यावर आज निलंबनाची कारवाई झाली. विविध प्रमाणपत्रे देण्यास लोकांकडून लाच घेणे, त्यांची सतावणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. चौकशीत दोषी आढळल्यास नोकरीतूनच बडतर्फ केले जाईल, असा इशारा नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.
तुयेकर हे लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी करत असत. तसेच वारंवार हेलपाटे मारण्यास लावून सतावणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी खात्याकडे आल्या होत्या. या गंभीर आरोपांमुळे त्यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
त्यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी खात्याचे मुख्य निगर नियोजक जेम्स मॅथ्यू करत आहेत. चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तत्काळ नोकरीतून बडतर्फ केले जाईल, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.
राणेंकडून दखल
काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विविध खात्यांत कामचुकार, भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यावर नगर व शहर नियोजन खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे काहींनी मंत्री राणेंना कळविले.
त्यात संबंधित अधिकाऱ्याने केलेली सतावणूक व पैशांची मागणी याची माहिती देण्यात आल्याने त्याची गंभीर दखल घेऊन मंत्र्यांनी ही कारवाई केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.