Vedanata Mine: ‘वेदांता’समोर नवी समस्या! खाणीच्या ‘ईसी’विरोधात आव्हान; ‘ईआयए’ अहवाल चुकीचा असल्याचा दावा

Bicholim News: डिचोली येथील खाण ब्लॉक-१ अंतर्गत येणारी ‘वेदान्‍ता’ कंपनीची खाण कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या खाणीला दिलेल्या ‘ईसी’विरोधात आता काही जागृत नागरिकांतर्फे राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) आव्हान देण्यात आले आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Local Residents File Petition Against Vedanta Mine's EC

डिचोली: येथील खाण ब्लॉक-१ अंतर्गत येणारी ‘वेदान्‍ता’ कंपनीची खाण कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या खाणीला दिलेल्या ‘ईसी’विरोधात आता काही जागृत नागरिकांतर्फे राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) आव्हान देण्यात आले आहे.

या खाणीला लोहखनिजाची वाहतूक करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेली पर्यावरणीय मंजुरी (ईसी) रद्द करावी, अशी मागणी करत मुळगावमधील काही नागरिकांनी ''ईसी'' विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे आव्हान दिले आहे.

जनसुनावणीपासून लीज क्षेत्र, ‘ईआयए’ अहवाल, खनिज वाहतूक आणि अन्य मुद्यावरून डिचोलीतील मुळगावसह शिरगाव, पिळगाव आदी काही गावातून खाणी विरोधात वातावरण आहे. घरेदारे, नैसर्गिक जलस्रोत आदी खाण लीजमधून वगळावीत, अशी खाणव्याप्त भागातील जनतेची मागणी आहे. हरित लवादाने आव्हान अर्ज दाखल करून घेताना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, राज्य सरकार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वेदांता कंपनीला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. समाजसेवक स्वप्नेश शेर्लेकर आणि अन्य चारजणांनी ‘एनजीटी’ कडे आव्हान अर्ज केला आहे.

‘ईसी’ला आव्हान

डिचोली खाण ब्लॉक-१ अंतर्गत येणाऱ्या डिचोलीतील ‘वेदांता’च्या खाणीला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या जानेवारी महिन्याच्या २३ तारखेला ''ईसी'' मंजूर केली आहे. डिचोलीतील खाण ब्लॉक-१ अंतर्गत डिचोलीसह मुळगाव, मये आदी जवळपासच्या गावांचा समावेश आहे. एकूण ४७८.५२०६ हेक्टर क्षेत्रफळात २५.१६२ एमटीपीए कचरा व्यवस्थापन, २८.२१ एमटी उत्खनन, ३.० एमटीए लोह खनिज उत्खनन, ४.० एमटीपीए क्षमतेचा क्रशिंग आणि स्क्रिनिंग प्लांटचा समावेश आहे.

Bicholim
GMC Theft: ‘गोमेकॉ’तील धक्कादायक प्रकार! 'ड्रग्स'साठी रुग्णांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक; तब्बल दहा मोबाईल जप्त

‘ईआयए’ अहवाल चुकीचा

१. ‘वेदांता’ खाणीसाठी तयार करण्यात आलेला पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल (ईआयए) पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे, असा दावा अर्जदारांनी केला आहे. खाण व्यवसाय बंद होण्यापूर्वी १९४१ सालापासून डिचोलीत खाण व्यवसाय सुरू आहे. तरीदेखील पर्यावरणीय आघात मूल्यांकन अहवालात (ईआयए) खाण प्रकल्पाचे ''ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट'' असे चुकीचे आणि दिशाभूल करणारे वर्गीकरण करण्यात आले आहे.

२. तज्ज्ञ मूल्यांकन समितीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यावरणीय मंजुरी देण्यापूर्वी अहवालाचे पुनरावलोकन करण्यात आलेले नाही, असा दावा आव्हान दिलेल्या याचिकादारांनी केला आहे. गेल्यावर्षी ११ ऑगस्ट रोजी झालेल्या जनसुनावणीवेळी ''ईआयए'' अहवालाचा हा मुद्दा तापला होता.

३. खाण ब्लॉक अंतर्गत येणारी शेतजमीन, घरे, जलस्रोत याबद्दलही आवश्यक माहिती पुरविण्यात आलेली नाही. खाण आणि भूगर्भ खात्याने दरदिवशी १६० ट्रिप खनिज वाहतूक निर्धारित केली आहे. मात्र पर्यावरणीय मंजुरीप्रमाणे दरदिवशी १२०५ ट्रिप खनिज वाहतूक करता येते, असा दावा करून याचिकादारांनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com