Cigarettes Seized
Cigarettes Seized Dainik Gomantak

Cigarettes Seized : ५ लाखांची सिगारेटची ८५५ पाकिटे केली जप्त

Cigarettes Seized : तंबाखू विरोधीदिनी अनेक दुकानांवर छापे
Published on

Cigarettes Seized :

पणजी, जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आज वजन व मापे खात्याने राज्यात अनेक ठिकाणच्या दुकानांवर छापे टाकले. राज्यभरात विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्या एकूण ४६ दुकानांची तपासणी करण्यात आली.

त्यापैकी १० दुकानमालकांनी कायद्याचे उल्लंघन करून विक्री करत असलेली देशी व विदेशी विविध ब्रँडच्या सिगारेट्सची ८५५ पाकिटे जप्त केली. त्याची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. या दुकानमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वजन व मापे खात्याने राज्यातील विविध तालुक्यांमध्ये छापे टाकले. काणकोण येथील २, मडगाव, फोंडा, पेडणे व वास्को या भागातून १, पणजी व म्हापाशातून प्रत्येकी २ दुकानांवर कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सिगारेट्सच्या ब्रँडमध्ये मार्लबोरो, कॅमल घी, इसे स्पेशल गोल्ड, डीजे अर्वम ब्लॅक, स्ट्रॉबेरी व सुपरशाईन्स, इडबे साईन,

वाटरमेलन आईस, टीई ६०००, डनहिल स्वीच, डेविडॉफ गोल्ड, मोंड सुपर स्लिमेस, कारेलिओ रेड, इल्फबर, बेन्सन अँड हेडजिस, गुडंग गरम, विन किंग साईज, फिलीस ब्लन्ट, एल अँड एम, मेवियस, असोस, गोल्ड फ्लेक, ब्लॅक, नॅचरल अमेरिकन स्पिरिट, डेविडॉफ व्हाईट, क्रेडो या ब्रँडचा समावेश आहे.

Cigarettes Seized
Goa Fishing Ban: एक जूनपासून मासेमारीस बंदी, पारंपारिक मच्छीमारांची आवराआवर सुरू

कारवाई करण्यात आलेली दुकाने

मे. संजय सुपरस्टोअर, काणकोण, मे. जे. के. स्टोअर, काणकोण, मे. अल अब्राह ड्राय फ्रुट्स चॉकलेट अँड कॉस्मेटिक्स, मडगाव, मे. आयशा जनरल स्टोअर्स, फोंडा, मे. बनारस पान भंडार, वास्को, मे. सोनिका स्टोअर्स, पणजी, मे. ए. डब्ल्यू. स्टोअर, पणजी, मे. तोफान जनरल स्टोअर, म्हापसा, मे. धनलक्ष्मी जनरल स्टोअर, म्हापसा व मे. फ्लाविना वाईन्स, पेडणे या दुकानांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com