Chorao Island Goa: "Our Island Not for Sale" चोडण वासियांचा मेगा प्रोजेक्ट्सना विरोध

Chorao Island: बेटावरील रहिवासी प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करीत आहेत
Chorao Island: बेटावरील रहिवासी प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करीत आहेत
Chorao Island GoaDainik Gomantak
Published on
Updated on

चोडण: गोव्यातील प्रसिद्ध मांडवी नदीच्या मध्यभागी वसलेलं चोडण बेट हे अनेक वर्षांपासून पर्यावरण आणि संस्कृतीक वारसा जपत आलंय. या बेटावर असलेल्या डॉ. सलीम अली बर्ड सेंचुरीमध्ये पक्ष्यांच्या 100 पेक्षा जास्त आणि खारफुटीच्या 9 प्रजाती पाहायला मिळतात, मात्र मानवी क्रियाकलापांमुळे या बेटावरील जैवविविधतेसाठी धोका निर्माण होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

बेटावरील रहिवासी प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करीत आहेत. बेटावरील पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून त्यांनी जेट्टीच्या प्रवेश दरवाज्यावर "Welcome to Chorao, Our Island Not for Sale" आणि "Save Chorao, Say No to Mega Projects" असे बॅनर्स उभे केले आहेत. बेटावर होऊ घातलेल्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी तसेच अनधिकृत विकासाविरोधात ठराव व्हवा म्हणून विशेष ग्रामसभेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुमारे 1,000 स्वाक्षरी केली आहे.

Chorao Island: बेटावरील रहिवासी प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करीत आहेत
Chorao Island In Goa: मांडवी नदीत वसलेले नयनरम्य 'चोडण' बेट

स्थानिक रहिवासी युसेबिओ डिसिल्वा यांनी फ्लोटिंग व्हिला आणि वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज यांमुळे पर्यावरणाला आणि जैवविविधतेला हानी पोहोचत असल्याचे मत व्यक्त एका इंग्रजी वृत्तपत्रासमोर व्यक्त केले, तसेच अश्विन चोडणकर नावाच्या स्थानिकाने अधिकृत परवानगी न घेता आलिशान नौकेसाठी बेकायदेशीरपणे जेट्टी बांधल्याचा आरोप केला.

चोडण-माडेलचे सरपंच सिल्वानो परेरा यांनी मात्र प्रकल्पांसंबंधीत कोणतेही औपचारिक अर्ज प्राप्त न झाल्याची माहिती दिली तसेच गावकऱ्यांनी उभारलेल्या बॅनर्समुळे हा प्रश्न उभा राहिल्याचं ते म्हणालेत. या समस्येवर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यापूर्वी ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com