Chikhale Waterfall: गोवा - कर्नाटक बॉर्डरवर कोसळतोय 'हा' मनमोहक धबधबा; कसे जाल, काय पहाल याची माहिती घ्या..

Waterfalls Near Goa: चिखले धबधबा हा बेळगावजवळील सर्वात चित्तथरारक धबधब्यांपैकी एक आहे, जो बेळगावपासून ४० कि.मी.वर असून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर वसलेला आहे.
Chikhale Waterfall
Chikhale WaterfallDainik Gomantak
Published on
Updated on

Waterfalls Near Goa:खोल दऱ्या, बोचरी थंडी, दाट धुके आणि त्यात हरवलेले रस्ते म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूतीच. ही अनुभूती त्या निसर्गाच्या प्रेमात पाडणारी आहे. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, तर पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे तुम्हाला साद घालताहेत. चला तर मग, गोवा-कर्नाटक हद्दीवरील चिखले या ग्रामीण भागातील फेसाळलेल्या धबधब्याला आपल्या मनोरुपी कॅमेऱ्यात टिपून घेऊया.. 

चिखले धबधबा हा बेळगावजवळील सर्वात चित्तथरारक धबधब्यांपैकी एक आहे, जो बेळगावपासून ४० कि.मी.वर असून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर वसलेला आहे. या ठिकाणाबद्दल एक मनोरंजक गोष्ट अशी आहे, की धबधब्याच्या जवळ एक जमीनीचा एक भाग आहे जिथे तुम्ही अक्षरशः एक पाऊल गोव्यात आणि दुसरे कर्नाटकात ठेवू शकता.

एक दिवसाचे पिकनिक डेस्टिनेशन म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेले चिखले गाव निसर्गरम्य आहे. येथील धबधबे लक्षणीय उंचीवरून खाली कोसळतात. ज्यामुळे तो विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एक नेत्रदीपक बनतो. पाण्याचे तुषार अंगावर पडल्यानंतर मनोहारी आनंद तुम्हाला द्विगुणीत करतो. पांढऱ्या शुभ्र जलधारा पाहुन तुम्ही ‘फुल एक्साइट’ होणार. प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करणारच. ‘फुल ऑक्सिजन... नो पोल्यूशन’ असलेले हे ठिकाण तुमच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये असू द्या.  

कुणी जावे... 

निसर्गाची आवड असलेल्या, ट्रेकिंग करणाऱ्या किंवा लपलेल्या सौंदर्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाने या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. येथून गोव्यापर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या टेकड्यांचे विलोभनीय दृश्य दिसते. जाताना पाणी आणि नाश्ता सोबत घ्या आणि आरामदायी ट्रेकिंग शूज घाला. कारण ३ कि.मी.च्या आसपास तुम्हाला काहीही मिळणार नाही. चला तर मग, निसर्गाच्या कुशीत एक आदर्श वीकेंड घालवूया..

Chikhale Waterfall
Goa Waterfall Ban: गोव्यातील 'या' प्रसिद्ध धबधब्यावर जाण्यास बंदी! धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी निर्णय

ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय

१.   चिखले धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गोव्याकडून चोर्लामार्ग जाता येते. चोर्लामार्गे कणकुंबीनंतर जांबोटीकडे जाणाऱ्या मार्गावर चिखले गावाच्या साइनबोर्डकडून उजव्या बाजुला वळण घ्या. पुढे ३ कि.मी. गाडी चालवा आणि नंतर ५०० मीटर चालल्यानंतर तुमचे वाहन पार्क करा.

२.   वाहन पार्क करताच समोर दाट धुक्याची झालर पांघरलेल्या पायवाटा आणि हिरव्यागार लँडस्केपमधून २.५ कि.मी.चा मध्यम ट्रॅक करा. 

३.  प्रत्येक पाऊल तुम्हाला झऱ्यांच्या पाण्याच्या खळखळणाऱ्या आवाजाबरोबर निसर्गसौंदर्याच्या आश्चर्यकारक दृश्याच्या जवळ घेऊन जाते. 

Chikhale Waterfall
Goa Tourism: मान्सूनमध्ये अनुभवा गोव्याचे जादुई सौंदर्य! पर्यटन विभागाची ‘ग्लो ऑन अरायव्हल’ मोहीम; 4 महिने वेगवेगळ्या थीम्स

४.  थ्रिल शोधणाऱ्यांसाठी, पारवाडमार्गे एक पर्यायी ट्रेकिंग मार्ग देखील उपलब्ध आहे, जो अधिक साहसी अनुभव देतो.

५.   सुरक्षेसाठी येथे कठडे उभारण्यात आले आहेत, तसेच सुरक्षारक्षक तैनात असतात.

६.  हे गाव कर्नाटक वनक्षेत्रात येत असून तेथे १८७९ साली उभारलेला वन क्षेत्राचा फलक दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com