Chikhal Kalo 2023: गोव्यातील 400 वर्षे जुना 'चिखल काला' उत्सवाची परंपरा नक्की काय? का साजरा केला जातो हा उत्सव?

गोव्यातील लोकांनी त्यांचे सण, उत्सव, पूर्वापार चालत अलेल्या परंपरा आजही जिवंत ठेवल्या आहेत.
Chikhal Kalo Festival Goa 2023
Chikhal Kalo Festival Goa 2023Dainik Gomantak

Chikhal Kalo Festival Goa 2023: आकाराने लहान असला तरी वैविध्यपूर्ण उत्सव आणि परंपरामुळे निसर्गसंपन्न गोवा, देशासह विदेशात नेहमीच पर्यटकांचे खास आकर्षण राहिला आहे. पोर्तुगीजांनी जवळपास चार शतके गोव्यावर राज्य केले, तरीही गोव्यातील लोकांनी त्यांचे सण, उत्सव, पूर्वापार चालत अलेल्या परंपरा आजही जिवंत ठेवल्या आहेत.

गोवा म्हटलं की सुंदर समुद्रकिनारे, मद्य, पार्टी, संगीत आणि भरगच्च कार्यक्रम डोळ्यासमोर येतात. यासह येथील गणेशोत्सव, नरकासूर, कार्निव्हाल, शिमगोत्सव, सांजाव आणि चिखल काला यासारख्या प्रसिद्ध उत्सवांचीही चर्चा होते.

येत्या आषाढी एकादशीनंतर गोव्यात चिखल काला हा प्रिसिद्ध उत्सव साजरा होणार. त्याच उत्सवाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Q

गोव्यातील प्रसिद्ध चिखल काला उत्सव नेमका काय आहे?

A

चिखल काला उत्सवाची परंपरा 400 वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. सुरूवातीला हा उत्सव गोव्यातील चोडण येथे साजरा केला जात होता, त्यानंतर माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थान येथे हा उत्सव साजरा व्हायला लागला. गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना मंदिरासह हा उत्सव देखील स्थलांतरित झाल्याचे स्थानिक सांगतात. मात्र, उत्सवाचा नेमकी सुरूवात कधी झाली हे सांगणे कठीण असल्याचेही स्थानिक म्हणतात.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास चिखल काला म्हणजे कपडे काढून उघड्या अंगाने चिखलात अक्षरश: लोळणे. यावेळी अनेक मनोरंजन करणारे अनेक खेळ खेळले जातात. आणि 'जय विठ्ठल, हरी विठ्ठल' असा हरीनामाचा जयघोष केला जातो.

Chikhal Kalo 2023
Chikhal Kalo 2023Dainik Gomantak
Chikhal Kalo Festival Goa 2023
Chikal Kalo Festival: गोव्यातील ‘चिखल काला’ उत्सवाचं रोगप्रतिकारक शक्तीशी आहे कनेक्शन?
Q

कसा साजरा केला जातो चिखल काला?

A

जून महिन्यात जगभरातील विठ्ठल भक्तांना विठ्ठल-रूक्माई भेटीचे वेध लागतात. चौफेर दिशातून निघणाऱ्या पायी वाऱ्या आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होतात. आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर गोव्यात चिखल काला उत्सव साजरा केला जातो.

आषाढी एकादशीला माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिरात आरती लावली जाते. त्यानंतर 24 तासांचा वेळ गेल्यानंतर मंदिराच्या समोरील मैदानात चिखल काला हा उत्सव रंगतो. यात लहान, वृद्ध, बालके असे सर्वच पुरूष सहभागी होतात. शरीरावर फक्त हाफ पॅन्ट घालून उघड्या अंगावर तेल लावले जाते आणि चिखलात लोळण्याचा हा उत्सव सुरू होतो.

यात चक्र, अंधळी कोशिंबीर, रस्सी खेच असे विविध खेळ खेळले जातात. उत्सवाचे शेवटी दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते.

Q

परंपरा आणि इतिहास काय?

A

चिखल काला उत्सवाची परंपरा 400 वर्षे जुनी किंवा त्याहून अधिक असल्याचे स्थानिक सांगतात. भगवान कृष्णाच्या बाललिला आणि त्याच्या लहानपणाचा खेळ म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिले जाते.

पोर्तुगीज राजवटीच्या काळातच मंदिरासह या उत्सवाचे स्थलांतर माशेल येथे झाले असेही सांगितले जाते.

माशेल येथील देवकीकृष्ण मंदिर 1842 साली उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, मंदिरातील देव त्यापूर्वी येथे आणल्याचेही स्थानिक सांगतात.

स्थानिक मोठ्या प्रमाणावर या उत्सवात सहभागी होतात, चिखलातील या उत्सवात महिलासोडून सर्वजण सहभागी होतात.

Chikhal Kalo 2023
Chikhal Kalo 2023Dainik Gomantak
Q

पर्यटन वाढीच्या दृष्टीने गोवा सरकार हा उत्सव कसा प्रमोट करते?

A

गोवा सरकारच्या पर्यनट वाढीच्या दृष्टीने नेहमीच विविध उत्सव कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रमोट करत असते. लहानशा गोव्याचे मुख्य अर्थकारण हे पर्यटनावरच आधारीत आहे. पावसाळ्यात राज्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी असल्याने अशा उत्सवांना सरकार प्रामुख्याने प्रमोट करते.

यावर्षी गोवा पर्यटन खात्याने 28 ते 29 जुलै दरम्यान संगीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. 28 जून रोजी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, अभिनेता आणि गायक देवानंद मालवणकर आणि गायिका प्रियंका रायकर यांचे संगीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. 29 जून रोजी भक्तीरंग हा संगीत कार्यक्रम होईल तर, 30 जून रोजी चिखल काला उत्सव साजरा होणार आहे.

Q

आयुर्वेद आणि निसर्गोपचारातील महत्त्व

A

चिखल काला म्हणजे चिखलाचा काला (पातळ मिश्रण) करुन ते अंगाला फासले जाते. त्यामुळेच ‘चिखल काला’ या सणाला आयुर्वेदिक दृष्ट्या बरेच महत्व असल्याचे वैद्य सुविनय दामले यांनी सांगितले.

“अंगाला जेव्हा माती लागते तेव्हा मातीतील काही बॅक्टेरिया जे माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात असे त्वचेला लागल्यावर ते अंगात भिनतात आणि त्या बॅक्टेरियांचे अँटी डोस तयार होतात. यालाच मृदा लेपन असेही म्हणतात. असे दामले यांनी सांगितले.

चिखल काला उत्सवाचे आयुर्वेदिक महत्व जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com