CM Pramod Sawant: खंडणीबहाद्दर ‘NGO' ना बसणार चाफ; मुख्यमंत्री सावंत यांनी दिला थेट कारवाईचा इशारा!

NGO: एनजीओच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्यांवर आळा घालू. तसे कोणी करत असल्यास तक्रार करावी, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे दिली.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak

Chief Minister Pramod Sawant: राज्यात मागील काही दिवसांपासून श्रेया धारगळकरचं प्रकरण चांगलचं गाजत आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी श्रेया धारगळकरचा मी निषेध करतो. त्याचबरोबर एनजीओच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्यांवर आळा घालू. तसे कोणी करत असल्यास तक्रार करावी, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे दिली.

समाजमाध्यमांवर तोंडाला येईल तसे सामाजिक, सांस्कृतिक वैयक्तिक पातळीवर बोलणाऱ्यांना या कारवाईतून रोख लावली जाईल. हा एक चांगला संदेश सरकारकडून गेला आहे. यापुढे कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मी स्वतः देवी लईराई, देवी कुंकळ्ळकरीणचा भक्त आहे. गोव्यातील धार्मिक स्थळांविषयी सर्वांना आदर आहे, त्यामुळे मी अशी बेजबाबदार वक्तव्ये सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

वैयक्तिक स्वार्थासाठी एनजीओ चालवणाऱ्यांसाठी पोलिस खाते आणि सोसायटी नोंदणी खात्याशी बोलून नियम आणि अटी ठरवल्या जातील. वैयक्तिकरीत्या आपल्या कुटुंबातील दोघांना घेऊन एनजीओ स्थापन करुन नंतर लोकांना मदत करण्याच्या नावाखाली दमदाटी करणे, पैशांची मागणी करणाऱ्यांवर सरकार कायदेशीर कारवाई करणार आहे. अशा एनजीओ चालवणाऱ्यांच्या गोमंतकीयांनी बळी पडू नये. थेट पोलिसात तक्रार करावी, असेही शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com