Cuncolim News: वेरोडा, कुंकळ्ळी येथील सेंट अँथनीज हायस्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी जखमी प्रकरणातील तपास अधिकारी उपनिरीक्षक कविता रावत यांच्याकडील तपास काढून घेण्यात आला असून आता हे प्रकरण तपास करण्यासाठी मडगाव महिला पोलिस स्थानकाच्या निरिक्षक सुदिक्षा बाईक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दोषी शिक्षिका लझीमा फर्नांडिस आणि मुख्याध्यापिका दोरेथी फर्नांडिस यांनी पणजी येथील बाल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्या दोघांच्या विरोधात भान्यासंच्या कलम १२५ (२) (काम करताना हलगर्जीपणा करणे) खाली गुन्हा नोंद केला आहे.
निरिक्षक नाईक यांनी गुरुवारी वेरोडा येथील शाळेत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले असून त्यांनी आपल्या तपासाला सुरुवात केल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनीता सावंत यांनी दिली. दरम्यान त्या मुलीची प्रकृती आता सुधारत असून तिला आता अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले.
ही घटना २६ सप्टेंबर रोजी घडली होती. दोन मुलांमध्ये झालेल्या भांडणात एक विद्यार्थिनी जखमी झाली होती. या प्रकरणी मुलीच्या आईने त्याच दिवशी तक्रार दिलेली असताना २ ऑक्टोबरपर्यंत हा गुन्हा नोंद न केल्याने लोक खवळले. त्यानंतर लोकांनी कुंकळ्ळी पोलिस स्थानकाला घेराव घातला. त्यानंतर ताबडतोब हालचाल करत तपास अधिकारी बदलण्यात आला.
दरम्यान, आज आयजीपी ओमवीर सिंग यांनी कुंकळ्ळीला भेट देऊन जखमी मुलीच्या घरच्यांची भेट देऊन विचारपूस केली. या प्रकरणाचा तपास कुठे पोचला हे जाणून घेण्यासाठी आजही लोकांनी पोलिस स्थानकावर गर्दी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.