Cooch Behar Trophy: कुचबिहार करंडक क्रिकेट; चंडीगडला रोखण्यात गोवा अपयशी

198 धावांचे आव्हान अखेरच्या षटकात पार
Cooch Behar Trophy
Cooch Behar TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

Cooch Behar Trophy: चंडीगडसमोर विजयासाठी ५६ षटकांत १९८ धावांचे आव्हान होते, मात्र गोव्याचे गोलंदाज त्यांना रोखण्यात अपयशी ठरले. परिणामी पाहुण्या संघाने चुरशीच्या लढतीत चार विकेट राखून विजय नोंदवत कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या ‘अ’ गटात सलग दुसरा सामना जिंकला. सांगे येथील जीसीए मैदानावर चार दिवसीय सामना झाला.

गोव्याचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना मुंबईने हरविले होते. त्यांचा पुढील सामना एक डिसेंबरपासून त्रिपुराविरुद्ध कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल. चंडीगडचे आता दोन सामन्यानंतर १३ गुण झाले आहेत.

गोव्याचा दुसरा डाव कालच्या ६ बाद १२७ वरून सोमवारी १७३ धावांत आटोपला. पहिल्या डावातील २४ धावांच्या आघाडीमुळे गोव्याने चंडीगडसमोर विजयासाठी १९८ धावांचे लक्ष्य ठेवले.

सलामीचा देवांग कौशिक (८०) व कर्णधार पारस (४४) यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. चंडीगडला १० षटकांत विजयासाठी ३३ धावांची गरज असताना युवराज सिंग याने या दोघाही जम बसलेल्या फलंदाजांना पाच चेंडूंच्या अंतराने बाद केल्यामुळे गोव्याच्या गोटात उत्साह संचरला.

मात्र नंतर निखिल याने २५ चेंडूंत झटपट २२ धावा केल्यामुळे विजय चंडीगडच्या दृष्टिपथास आला. सामन्यातील अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर निशुंक बिर्ला याने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिशांकची अर्धशतकी खेळी व्यर्थ

गोव्याच्या दिशांक मिस्कीन याने १७७ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ६८ धावा करताना संघाला ६ बाद ८८ धावांवरून सावरले. त्याने स्वप्नील गावकर याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. मात्र सामना गमावल्यामुळे दिशांकचे झुंजार अर्धशतक व्यर्थ ठरले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: २९८.

चंडीगड, पहिला डाव: २७४.

गोवा, दुसरा डाव (६ बाद १२७) वरून: ८८.५ षटकांत सर्वबाद १७३ (दिशांक मिस्कीन ६८, स्वप्नील गावकर ११, युवराज सिंग ०, रुद्रेश शर्मा १, दर्शन महेंद्रकर नाबाद ३, अनमोल शर्मा ६१-३, निखिल ३१-३, देवांग कौशिक १४-२).

चंडीगड, दुसरा डाव: ५५.१ षटकांत ६ बाद २०१ (देवांग कौशिक ८०, पारस ४४, निखिल २२, पुंडलिक नाईक १६.१-५-४८-१, युवराज सिंग १९-५-५१-३, स्वप्नील गावकर ५-१-२१-२, यश कसवणकर १२-२-५६-०, शंतनू नेवगी १-०-६-०, रुद्रेश शर्मा २-०-१३-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com