Cashews Farmer : काजू उत्पादनात गोवा आत्मनिर्भर बनावा : आमदार दिव्या राणे

Cashews Farmer : ‘काजू फेस्त’मध्ये रंगली सांगीतिक संध्याकाळ
Cashews
CashewsDainik Gomantak

Cashews Farmer :

पणजी, गोव्याला काजू उत्पादनात स्वावलंबी बनवणे आणि स्थानिक काजू फळे व त्याच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे, हा ‘काजू फेस्ट गोवा’ कार्यक्रम आयोजना मागचा मुख्य उद्देश असल्याचे पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

लोकांनी हा फेस्ट खूप आवडला असे मत राणे यांनी व्यक्त केले. गेल्या दोन दिवसांपासून शेकडो लोकांनी पणजीत काजू फेस्टला भेट दिली. ध्वनी भानुशाली, ॲश किंग,अखिल सचदेव आदी प्रसिद्ध गायकांनी लाईव्ह संगीत सादर केले.

या फेस्टमध्ये लोकांना फेणी, हुर्राक बनवण्याच्या प्रक्रियेचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. काजूचे अनेक पदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या फेस्टला लोकांकडून उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.

Cashews
Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

डॉ. राणे म्हणाल्या की, ‘काजू फेस्ट आयोजनामागील मुख्य उद्देश गोव्याला काजू उत्पादनात अग्रेसर बनवण्याचा ध्यास आहे आणि आम्ही इतरांकडून यापुढे काजू आयात करू नये तर आम्ही स्वतःच उत्पादनात आत्मनिर्भर होऊ. आपले कृषी, वन अधिकारी, शेतकरी एकत्रित आल्यावर हे हळूहळू होईल.

काजूचे उत्पादन वाढवण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञान आणि प्रकार वापरले जाऊ शकतात. आम्ही हा कार्यक्रम शेवटी ठेवला आहे जेणेकरून काजू उत्पादनाच्या पद्धतींचा भरपूर प्रचार होईल. ब्रँड गोवन फेस्टचे मालक राजेंद्र जाधव म्हणाले की, आम्ही गोवन काजूवर आधारित उत्पादने या फेस्टमध्ये घेऊन आलो आहोत.

‘काजू फेस्टिव्हल’ मध्ये काजूचे स्टॉल, काजू उत्पादने आणि मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ते खास आले होते. आपल्या स्थानिक फळांचा प्रचार करणे हा आपल्या संस्कृतीचा प्रचार करण्याचा एक मार्ग आहे.

-ॲड.कार्लुस फेरेरा,

हळदोण्याचे आमदार

रसिक मंत्रमुग्ध

संध्याकाळच्या वेळी, प्रसिद्ध गायक ॲश किंग तसेच अखिल सचदेव यांनी या काजू फेस्ट गोवामध्ये आपल्या गायकीने लोकांना मोहीत केले. हे मंत्रमुग्ध करणारे संगीत अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com