Sankhalim Theft Case: कुडणे साखळी येथील महालक्ष्मी हायस्कूलमध्ये शनिवारी (ता. 23) रोजी रात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून मुख्याध्यापकांच्या कक्षातील ड्रॉवर मधील साठ ते सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे.
या प्रकरणी हायस्कूलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मळीक यांनी डिचोली पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तपास करताना आज ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले. मात्र काही माग लागला नाही. चोरांची टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारपासून शाळांना सुट्टी असल्याने चोरट्यांनी डाव साधला.
मोलेतील अभिनव विद्यामंदिर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बुरखाधारी चोरटे दिसले. चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नाही. कुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, राज्यात चोरांची टोली सक्रिय झाली असून सोने लंपास होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने जुने गोवेत एका महिलेचे 1.70 लाखांचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी विक्रम भागात (37, दिल्ली), मोहम्मद फिरोज (31, बिहार) यांना ताब्यात घेतले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.