गाड्या चोरणारी टोळी जेरबंद; राजस्‍थानात आवळल्‍या मुसक्‍या

8 लाखांच्‍या कारसह रोकड, अन्‍य साहित्‍य जप्‍त
Thief arrested
Thief arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विविध राज्यांतून गाड्या चोरून त्‍या राजस्थान आणि गुजरातमध्ये अमलीपदार्थ तसेच दारूची तस्करी करणाऱ्यांना विकणाऱ्या बाडमेर-राजस्थान येथील टोळीतील चौघांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यास पर्वरी पोलिसांना यश आले. त्‍यांनी सुरत पोलिसांच्‍या सहकार्याने हे ‘मिशन’ फत्ते केले. संशयित आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीची कार, 5 बनावट चाव्या, काचेचे कटर आणि 37 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Thief arrested
पणजी फुटबॉलर्सच्या पदाधिकाऱ्यांवर ठपका

वन-म्‍हावळिंगे-डिचोली येथील अजित विरजी यांनी सांगोल्डा येथे पार्क केलेली आपली कार चोरीला गेल्याची तक्रार पर्वरी पोलिसांत केली होती. त्‍यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. मिळालेल्‍या सीसीटीव्‍ही फुटेजवरून माग काढत पोलिसांनी संशयित आरोपी श्रवण कुमार राम (24), राम जीवन (29), अरविंद बिश्नोई (32) आणि कृष्णा माळी (24) यांना अटक केली. हे सर्व राजस्थानचे रहिवासी आहेत. सुरत-गुजरात येथे पोलिसांनी फिल्‍मी स्‍टाईल पद्धतीने पाठलाग करून त्‍यांना पकडले. विरजी यांचे चोरीला गेलेले वाहन अद्याप सापडले नसून पोलिस शोध घेत आहेत.

Thief arrested
'झुआरी जमीन घोटाळ्यावर सरकारची करडी नजर'

दरम्‍यान, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना आणि पर्वरीचे पोलिस उपअधीक्षक विश्‍वास कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या या विशेष पथकात पर्वरीचे पोलिस निरीक्षक अनंत गावर, उपनिरीक्षक सीताराम मळीक, हवालदार संदीप परब, शिपाई महादेव नाईक आणि प्रज्योत परब यांचा समावेश होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून काढला माग

अजित विरजी यांच्‍या तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक स्‍थापन केले. गोवा-महाराष्ट्र मार्गावरी सीसीटीव्ही फुटेज तपासल्‍यावर संशयित आरोपी बाडमेर-राजस्थान येथील असल्याचे जवळपास निश्‍चित झाले. त्यानुसार हे पथक राजस्थानाला रवाना झाले. तेथे पोहोचल्यावर संशयित आरोपी गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. त्‍यानंतर या पथकाने सुरत पोलिसांशी संपर्क साधून संयुक्त कारवाई करताना संशयितांना पकडले. त्‍यांना गोव्‍यात आणून न्‍यायलयात उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com