Goa Accident : वेगाची नशा महागात; नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली

वालकिणी सांगे येथे भरधाव कार दरीत कोसळून अपघात झाला आहे.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident : वालकिणी सांगे येथे भरधाव कार दरीत कोसळून अपघात झाला आहे. कार वेगात असल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार लेन क्रॉर करुन रस्त्याशेजारी असलेल्या खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान हा अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. याप्रकरणी अद्याप पोलिस स्टेशनमध्ये कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. हा अपघात एवढा भयंकर होता कारचं चाकही निखळून पडलं. कारचं अपघातामुळे मोठं नुकसान झालं असून चालकालाही गंभीर इजा झाली आहे.

कारचालक गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. त्यामुळे मोबाईलच या अपघातास कारणीभूत ठरल्याची शक्यता आहे.

Goa Accident
Goa Accident: धक्कादायक! वेर्णा येथे भरधाव टॅक्सीने युवकाला उडवलं

दुसरीकडे वेर्णा येथे भरधाव टॅक्सीने जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला युवक हा 27 वर्षाचा असून, तो झुआरी नगर येथील काम संपल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गौडा ( 27 वय ) हा जुवारी नगर येथे काम करत होता. काम संपवत दुचाकीने घरी जात असताना वेर्णा आग्नेल आश्रम सर्कलजवळ कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सीने त्याला धडक दिली. यातच गौडा त्याचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com