Pandharpur Wari : काणकोणातील वारी पंढरपुरात दाखल

Pandharpur Wari : १४ दिवसांचा पायी प्रवास : उडानवाडी येथे पार पडले रिंगण
Pandharpur Wari
Pandharpur Wari Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव, काणकोण येथून संत श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळांची वारी १३ दिवसांचा प्रवास करीत ३५८ किलो मीटरचे अंतर कापून उडानवाडी येथे शनिवारी रात्री मुक्कामाला पोहोचले.

तिथे गोल रिंगण पार पडले. तिथल्या हनुमान मंदिरात वारकऱ्यांनी विश्रांती घेतली व पहाटे पुन्हा नव्या जोमाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. सोमवारी (१५ रोजी) ही वारी श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल होणार

दिवसाला ३० ते ३४ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले जाते. रात्रीच्या वेळी रस्त्यालगत एखाद्या मंदिर आवारात किंवा वारकऱ्यांची सेवा म्हणून तयार करण्यात आलेल्या शेडमध्ये मुक्काम केला जातो. पहाटे परत चालायला सुरुवात होते. नाष्टा जेवण बनवण्याचे साहित्य व इतर आवश्यक साहित्य घेऊन जाण्यासाठी वारी सोबत एक- दोन वाहने असतात. वारीत मंडळातर्फे सर्वांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. वारकरीही एकमेकांना सांभाळून घेतात.

गोवा ते पंढरपूर पायी जात असताना अनेक बरे वाईट अनुभव येतात. गोव्यातील अनेक विठ्ठल भक्त वारकऱ्यांना मदत करतात. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागातून चालणाऱ्या वारकऱ्यांना वाटेत अनेक प्रकारचे साहाय्य विठ्ठल भक्तांकडून मिळत असते.

दैनंदिन जीवनातील सर्व अडीअडचणी बाजूला ठेवून वारीत सहभागी झाल्यावर मनाला शांती आणि एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते, यासाठी एकदा तरी वारी करावीच, असे मत वारकरी व्यक्त करतात.

आयुष्यात एकदा तरी वारी करावी. माऊली माऊलीचा गजर करत कपाळावर वारकरी टिळा लावत, पायी चालत, अध्यात्माचा एक डोळे भरून येणारा अनुभव घ्यावा, याबाबतीत मी स्वतःला नशीबवान समजतो.

कारण ८ वी आषाढी वारी करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. वारीमुळे माझ्या जीवनात खूप मोठा बदल घडला आहे. जबाबदारी सांभाळतानाच टाळ, मृदंगाच्या गजरात एक-एक पाऊल पंढरपूरच्या दिशेने टाकणारे वारकरी यांच्यातील अध्यात्माची जाणीव मी अनेकदा अनुभवाला आहे

अरुण नाईक, वारकरी

Pandharpur Wari
Justice Thottathil B Radhakrishnan Passed Away: उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल 63 व्या वर्षी निधन

मामा माऊली म्हणून प्रसिद्ध असलेले अरुण नाईक यांनी आपल्या आयुष्यातील ६१ वर्षे पूर्ण केली आहेत, पण ते वारी ज्या जोमाने व उत्साहाने पुढे नेतात त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

-राजू गोसावी, सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com