Vijay Sardesai : विजय सरदेसाई यांनी ऐकली काणकोणवासीयांची गाऱ्हाणी

Vijay Sardesai : विधानसभेत आवाज उठविण्याचे दिले आश्वासन
MLA Vijay Sardesai
MLA Vijay SardesaiDainik Gomantak

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी शनिवारी काणकोण मतदारसंघातील रहिवाशांची गाऱ्हाणीऐकली व त्यांच्या समस्यांविरोधात येत्या विधानसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पक्षाच्या पर्यावरण कक्षाचे प्रमुख विकास भगत व श्रीस्थळचे माजी सरपंच दत्ता गावकर, पक्षाचे मोहनदास लोलयेकर उपस्थित होते.

काणकोणात खंडित वीजपुरवठा, काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातील समस्या आणि गावणे धरणाचाही प्रश्न आहे. गावणे धरण जलाशयात विपूल पाण्याचा साठा असूनही उन्हाळ्यात गावडोंगरी, खोतीगाव‌ व अन्य भागातील रहिवाशांना नदीच्या पात्रात खड्डे खणून पेयजल मिळवावे लागते.

उन्हाळ्यात या भागात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बेभरवशाचा असतो, अशी कैफीयत गावडोंगरी व खोतीगावमधील रहिवाशांनी सरदेसाई यांच्यासमोर मांडली. काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांसंदर्भात येणाऱ्या विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या काणकोण शाखेतर्फे आयोजित पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या ‘जनता दरबार’ कार्यक्रमाला आज अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. चावडी-काणकोण येथील पक्ष कार्यालयात आयोजित या दरबारात विविध गटांकडून तीसहून अधिक निवेदने सादर करण्यात आली. त्याशिवाय वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न घेऊन आलेल्यांची संख्याही लक्षणीय होती.

डॉक्टरांचा अभाव

काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राची इमारत मोठी आहे. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांचा अभाव आहे. या आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत मूत्रपिंड विकाराने त्रस्त १६७ रुग्ण आहेत. मात्र, त्यांना आरोग्य केंद्रातील लिफ्ट नादुरुस्त होत असल्याने पायऱ्यांवरून ये-जा करावी लागत आहे.

प्रसंगी आंदोलन करू!

यावेळी सरदेसाई यांनी काणकोणकरांचे जास्तीत जास्त प्रश्न विधानसभेत मांडून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जे प्रश्न विधानसभेत पाठपुरावा करूनही सुटणार नाहीत त्यासाठी आंदोलन करण्यास तयार राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com