Canacona Agriculture : कृषी खात्याच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : नागेश कोमरपंत

Canacona Agriculture : कृषी खात्याच्या यांत्रिक कृषी व्यवसायासाठी अनेक अनुदान स्वरूपाच्या योजना आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहन काणकोणचे साहाय्यक कृषी संचालक नागेश कोमरपंत यांनी केले आहे.
Canacona
Canacona Dainik Gomantak

Canacona Agriculture :

काणकोण, कृषी खात्याच्या शेतकऱ्यांना यांत्रिक शेती करण्यासाठी भरघोस योजना आहेत. मनुष्यबळ वापरून शेती करणे फायदेशीर नसल्याने यांत्रिक पद्धतीने शेती केल्यास ती फायदेशीर ठरते.

कृषी खात्याच्या यांत्रिक कृषी व्यवसायासाठी अनेक अनुदान स्वरूपाच्या योजना आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहन काणकोणचे साहाय्यक कृषी संचालक नागेश कोमरपंत यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी जया, ज्योती, कर्जत व अन्य संकरित भातबियाणी ५०% अनुदानावर गोवा बागायतदार संस्थेच्या काणकोण शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याशिवाय सर्व प्रकारची भाजी बियाणी विभागीय कृषी कार्यालयात पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर व अन्य कृषी अवजारांच्या खरेदीसाठी कृषी खात्यातर्फे ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.

अनुसूचित जमातीसाठी खतासाठी ७५ टक्के अनुदान आहे. त्याशिवाय काजू, आंबा, चिकू, नारळ, मिरी, मसाला यासारख्या बागायती पिकांची रोपटी कृषी खात्यातर्फे ५० टक्के अनुदान देऊन उपलब्ध करून देण्यात येतात. अशाप्रकारच्या कृषी खात्याच्या भरघोस योजना असूनही काणकोणात शेतजमिनी पडिक ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. याची कारणे कृषी खात्याने शोधण्याची गरज आहे.

Canacona
Hyderabad To Goa: एक प्रवास बारा भानगडी! कोणाची मुलाखत, कोणाचे महत्वाचे काम, 25 जणांची समस्याग्रस्त गोवा ट्रीप

काणकोणात एकूण १,८०० हेक्टर जमीन खरीप भातशेती लागवडीखाली आहे आणि सर्व जमिनीवर भातशेतीची लागवड करण्यात येते, असा काणकोणच्या विभागीय कृषी कार्यालयाचा दावा आहे.

तालुक्यात ४२ हेक्टर शेतजमीन वायंगण पिकाखाली आहे.

तालुक्यात सर्वाधिक खरीप भातशेतीची जमीन गावडोंगरी पंचायत क्षेत्रात आहे.

काणकोण तालुक्यात शेती व बागायती क्षेत्राखाली ९,१२० हेक्टर जमीन लागवडीखाली आहे.

खरीप हंगामात २५० हेक्टर जमीन रब्बी हंगामात ३५० हेक्टर जमीन भाजी लागवडीखाली आहे.

३,५०० हेक्टर जमिनीवर काजू लागवड केली आहे.

गालजीबाग, लोलयेत पडिक जमिनी

पैंगीण येथील गालजीबाग नदीच्या वरच्या टप्प्यातील वायंगण शेतजमीन गेली अनेक वर्षे लागवडीविना आहे. पैंगीण येथील गालजीबाग पुलाच्या वरच्या व खालच्या बाजूची सुमारे पाच हेक्टर जमीन बंधारे उभारूनही पडिक ठेवण्यात येत आहे. लोलये येथेही शेकडो एकर पिकाऊ वायंगण शेतजमीन गेली वीस वर्षे पडिक आहे.

यासंदर्भात कृषी खात्याने संबंधित शेतकऱ्यांची बैठक बोलावून जमिनी पडिक ठेवण्यामागील कारणे जाणून घेण्याची गरज आहे. चापोली धरण जलसिंचनाखाली गेलेली जमीन अनेक वर्षे पडिकच आहे. ही सर्वच भात शेतीची जमीन लागवडीखाली आल्यास काणकोण तालुका सुजलाम्‌ सुफलाम्‌ होणार आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com