Canacona News : गटारे न उपसल्याने घरांत घुसणार पाणी; नगरसेवकाचा दावा

Canacona News : मास्तीमळ प्रभागातील गटारांची साफसफाईच नाही
Canacona
CanaconaDainik Gomantak

Canacona News :

काणकोण, पावसाळा तोंडावर येऊनही काणकोण पालिका क्षेत्रातील काही प्रभागांतील गटारे व्यवस्थित उपसली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरांत पाणी घुसण्याची शक्यता मास्तीमळ मार्गाचे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी व्यक्त केली आहे.

मास्तीमळ प्रभागातील दहापेक्षा जास्त गटारे आहेत, फक्त एक दिवस सात कामगारांना आणून केवळ एक गटार उपसल्यासारखे केले आहे. वीस कलमी कार्यक्रमांतर्गत बांधलेल्या दोन्ही वसाहतीतील गटारे, शेळेर, काणकोण आयटीआय ते माजी आमदार विजय पै खोत यांच्या घरापर्यंतचे गटार व अन्य भागातील गटारे पालापाचोळा व गाळाने भरलेल्या अवस्थेत आहेत.

दरवर्षी पालिका मॉन्सूनपूर्व गटारे उपसण्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करते. मास्तीमळप्रमाणे देळे प्रभागातील गटारे गाळाने व पालापाचोळ्याने भरलेली आहेत, असे नगरसेवक धिरज नाईक गावकर यांनी सांगितले.

Canacona
Goa BJP: 200 किलो पेढे, 20,000 झेंडे! गोव्यात भाजप ‘पार्टी मूड’मध्ये; विजयोत्सवासाठी सज्ज

सध्या कामगार पाटोळे प्रभागात गटारे उपसण्याचे काम करीत आहेत. काही गटारे उपसणे बाकी असल्यास ती लवकरच उपसण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सारा नाईक देसाई यांनी सांगितले.

‘आचारसंहितेमुळे गटारे उपसण्यास विलंब’

यासंदर्भात नगराध्यक्ष सारा नाईक देसाई यांना विचारले असता लोकसभेच्या आचारसंहितेमुळे गटारे स्वच्छ करण्याची कामे उशिरा सुरू करण्यात आली. त्यात कामगारही मिळणे कठीण बनल्याने काही काळ कामे रेंगाळली.

गटारे उपसण्याच्या कामाला माजी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी सुरू केले होते. धिरज नाईक गावकर यांच्या मास्तीमळ प्रभागातील गटारे पहिल्यांदा स्वच्छ करण्यात आली असे माजी नगराध्यक्ष नाईक गावकर यांचे म्हणणे असल्याचे सारा नाईक देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com