Canacona News : भाजपच्या लेखी अल्पसंख्याक देशद्रोही : विजय सरदेसाई

Canacona News : मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये दंगल घडवून भाजपने लोकशाहीचा गळा आवळला. मात्र, लोकसभा निवडणुकीत खासदार निवडून येणार असल्याचे कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
Canacona
Canacona Dainik Gomantak

Canacona News :

काणकोण, भाजप अल्पसंख्याकाना देशद्रोही ठरवत आहे. सध्या ‘भारत खतरे में नहीं है’ तर भाजपच्या कारकिर्दीत ‘संविधान खतरे में है’. हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची ही निवडणूक नसून राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठीची ही निवडणूक आहे.

गोवा म्हणजे अंध भक्तांचे राज्य नाही, हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे इंडिया आघाडीचा घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

सभापतीनींच विधानसभेत भ्रष्टाचार चालू असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. काणकोणमध्ये किडनी रूग्ण जास्त आहेत. मात्र, अजूनही त्यावर उपायाबाबत सरकार अपयशी ठरले आहे. लोकसभा निवडणूक ही, २०२७ ची विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.केंद्र सरकारने अनुसुचित समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन फसवले आहे,अशी टीकाही सरदेसाई यांनी केली.

मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये दंगल घडवून भाजपने लोकशाहीचा गळा आवळला. मात्र, लोकसभा निवडणुकीत खासदार निवडून येणार असल्याचे कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले,की सरकारने राज्याला इव्हेंट करून कर्जाच्या खाईत लोटले आहे. त्यासाठी भाजपला लोकसभा निवडणुकीत अद्दल घडविण्याची गरज आहे.

Canacona
Goa College Admission Process: राज्यातील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया १० मेपासून; गुणवत्ता यादीनुसार प्रवेश

सरकार बदलले नाहीतर किनारी भागातील घरांवर सीआरझेड मुळे नांगर फिरण्याची शक्यता आहे. त्यासाठी दक्षिण गोव्यातून विरियातो यांनाच केंद्रात पाठविण्याची गरज आहे,असे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, जनार्दन भंडारी यांची भाषणे झाली. विकास भगत, दत्ता गावकर, कॉंग्रेसचे गटाध्यक्ष‌ आबेल बोर्जीस, राजेंद्र देसाई, प्रशांत नाईक,तारा केरकर, संदेश तेलेकर, मोहनदास लोलयेकर,गास्पर,कुतिन्हो, गावडोंगरीचे पंच आनंद वेळीप, उमेदवार विरियातो फर्नांडिस, बीना नाईक, प्रमोद फळदेसाई आमदार व्हेंझी व्हिएगस उपस्थित होते.

विरियातोंवर आरोप हा सैन्यदलाचा अवमान

काणकोणातील जमिनीवर दिल्ली व अन्य ठिकाणच्या भूमाफियांची नजर आहे. भाजपच्या सरकारने ३५ हजार कोटींचे कर्ज गोमंतकीयांवर करून ठेवले आहे.

युद्धात देशाच्या संरक्षणासाठी रणांगणावर लढाई केलेल्या आणि देशच प्रथम म्हणणाऱ्या कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यावर नाहक आरोप करून भाजपने देशाच्या सैन्य दलाचा अपमान केला आहे, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

भाजपने इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा धसका घेतला आहे. जासिंतो बेटावर तिरंगा फडकवण्यासाठी कॅप्टन विरायतो फर्नांडिस यांचा मुख्य वाटा आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष दिशाभूल करीत आहेत.

-अमित पाटकर,

प्रदेशाध्यक्ष (कॉंग्रेस)

उमेदवारी ही इंडिया आघाडीने माझ्यासाठी नाही, तर ती मच्छीमार, महिला, टॅक्सी चालक, मोटारसायकल पायलट, एससी,एसटी यांचा आवाज लोकसभेत नेण्यासाठी,संस्कृती जपण्यासाठी मिळाली आहे.

-कॅ.विरियातो फर्नांडिस, दक्षिण गोवा उमेदवार (काँग्रेस)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com