Goa Police: पर्यटन हंगाम सुरु होताच गोवा पोलिस Action Mode मध्ये, 271 दलालांच्या आवळल्या मुसक्या!

Goa Illegal Touts Arrested 2024: कळंगुटमधील बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जातेय. यामध्ये पर्यटकांना फसवणाऱ्या दलालांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे.
Goa Police: पर्यटन हंगाम सुरु होताच गोवा पोलिस Action Mode मध्ये, 271 दलालांच्या आवळल्या मुसक्या!
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: राज्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. पण गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षाही तेवढी महत्त्वाची आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोवा पोलिसांकडून विशेष पाऊले उचलली जात आहेत.

पर्यटकांसाठी कळंगुट हे हॉटस्पॉट आहे. कळंगुटमध्ये पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. कळंगुटमधील बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जातेय. यामध्ये पर्यटकांना फसवणाऱ्या दलालांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे.

Goa Police: पर्यटन हंगाम सुरु होताच गोवा पोलिस Action Mode मध्ये, 271 दलालांच्या आवळल्या मुसक्या!
Calangute Police: मद्यधुंद पर्यटकाला मारहाण भोवली; Video Viral झाल्याने पोलीस हवालदाराची नोकरी धोक्यात

दरम्यान, कळंगुटमध्ये पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, या दृष्टीकोनातून पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबवण्यात आली. तसेच, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कटीबद्धताही यामधून दिसून येते.

पोलीस राज्यात सक्रीय असलेल्या दलालांविरुद्ध धडक कारवाई करत आहेत, ज्यामध्ये यावर्षी त्यांनी पर्यटक व्यापार कायदा 1982 अंतर्गत कळंगुट पोलीसांनी 271 बेकायदेशीर एजंट/टाउटच्या मुसक्या आवळल्या. या कायद्यातर्गंत पहिल्यांदा 5,000 रुपये दंड आकारला जातो. तर गुन्हेगारी कृत्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत दंड आकारला जातो.

Goa Police: पर्यटन हंगाम सुरु होताच गोवा पोलिस Action Mode मध्ये, 271 दलालांच्या आवळल्या मुसक्या!
Calangute Police: कळंगुटमध्ये अचानक भाडेकरू पडताळणी मोहिम; अनेकांचे बेकायदेशीर वास्तव्य

पर्यटकांची सुरक्षा

उत्तर गोवा जिल्ह्यातील सर्व किनारी पोलीस स्टेशन पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाणे सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com