Calangute: कळंगुट पंचायतीची मोठी कारवाई! 22 अतिक्रमणांवर हातोडा; मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात

Calangute illegal shops: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या एकूण २२ दुकानांवर कळंगुट पंचायतीने कारवाई केली. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात होता.
Calangute illegal shops
Calangute illegal shopsDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या एकूण २२ दुकानांवर कळंगुट पंचायतीने कारवाई केली. यावेळी सरपंच जोसेफ सिक्वेरा, इतर पंच आणि सचिव अर्जुन वेळीप उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात होता. गुरुवारी दिवसभर केलेल्या कारवाईत मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या २२ दुकानांवर बुलडोझरच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

Calangute illegal shops
Illegal Constructions: अनधिकृत बांधकाम यादी प्रसिद्ध करा! ‘जीसीझेडएमए’ला NGT ची अंतिम मुदत

पंचायत मंडळ गेले चार महिने कारवाई करणार, असे सांगत होते; परंतु आजच्या कारवाईची पुसटशीही कल्पना स्थानिक दुकानदारांना दिली नव्हती. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा दयानंद शिरोडकर यांनी केला.

Calangute illegal shops
Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

नोटिसा देऊनच कारवाई; सचिव

ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केली आहे. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या दुकानदारांना रितसर नोटिसा पाठवून कारवाईची कल्पना देण्यात आली होती, असे पंचायत सचिव अर्जुन वेळीप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com