Quepem Bus : बससेवेअभावी विद्यार्थ्यांची परवड; पालकांची पायपीट

Quepem Bus : आंबेउदक-सावर्डेतील समस्या त्वरित सोडवा
Quepem Bus
Quepem Bus Dainik Gomantak
Published on
Updated on

केपे, राज्य सरकार मुलांना शिक्षण मिळावे म्हणून बऱ्याच योजना आखत आहे; पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसेल तर या योजनांचा काय उपयोग, असा प्रश्न सावर्डे मतदारसंघातील आंबेउदक येथील पालकांनी उपस्थित केला आहे.

आंबेउदक येथे दररोज येणारी कदंबची बस आठवड्यात दोनवेळा येऊ लागल्याने विद्यार्थ्यांवर शाळेला सुट्टी घेण्यावाचून कोणताच पर्याय उरलेला नाही. आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून पालक तीन किलोमीटर पायपीट करत गुड्डेमळ येथे येऊन बस पकडून मुलांना शाळेत पाठवतात.

सावर्डेपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर कोणत्याच विद्यालयाचा बालरथही जात नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने विद्यार्थी व पालक भिजत जाऊन बस पकडत आहेत. या पावसाळ्यात मुलांना पायी चालणे शक्य होत नाही, असे लोहार यांनी सांगितले.

आठवड्यात केवळ दोनच दिवस येणाऱ्या बसवर अवलंबून मुलांना महिन्यातील सहाच दिवस शाळेत पाठवायचे का, असा प्रश्न महादेव सावंत देसाई यांनी उपस्थित केला. विचारलेल्या वेळी बस ब्रेकडाऊन आहे, हीच उत्तरे दिली जातात.

राजकारण्यांना याचे काहीच पडून गेलेले नाही. निवडणुकीपुरता आमचा वापर केला जातो. त्यानंतर आमच्या लहानसहान मागण्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते, अशी खंत नंदेश सावंत देसाई यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंबेउदकच्या रस्त्यावर अवजड वहानांची वाहतूक सुरू असते. चालत जाणाऱ्या लहान मुलांना अपघात झाल्यास त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Quepem Bus
IND vs USA FIH Women Olympic Qualifier: अमेरिकेने टीम इंडियाची उडवली दाणादाण; ऑलिम्पिकची सीट धोक्यात

३५ वर्षे सुरू असलेली बस रद्द

 ही बस पूर्वी आंबेउदकवरून कष्टी, काले आणि परत आंबेउदक असा प्रवास करत होती. ३५ वर्षे सुरू असलेली ही बस आता का रद्द करण्यात आली याचे कारण सांगितले जात नाही. फोन करून विचारणा केल्यास नादुरुस्त आहे, हेच उत्तर दिले जाते. हायस्कूलच्या मुलांची पालक ने-आण करत आहेत; पण लहान मुलांचे हाल होत आहेत, असे महादेव सावंत देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com