Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Buimpal kidnapping attempt: भुईपाल येथे १२ वर्षीय मुलाचे भर वस्तीतून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. वाळपई पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून वेगवेगळ्या अंगांनी तपास सुरू केला आहे.
Goa Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: भुईपाल येथे रविवारी १२ वर्षीय मुलाचे भर वस्तीतून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. आज वाळपई पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून वेगवेगळ्या अंगांनी तपास सुरू केला आहे. अनेक साक्षीदारांचे जबाब घेतले असून, या भागात सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत का, याचीही पडताळणी सुरू केली आहे.

पीडित मुलाने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन स्वतःची सुटका केली. त्यामुळे अपहरण टळले. तो मुलगा नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळ राहणाऱ्या आतेभावाला घरी सोडण्यासाठी गेला होता. तो परतत असताना पांढऱ्या रंगाची ओमनी गाडी त्याच्याजवळ थांबली.

गाडीतील एकाने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने तत्काळ त्या व्यक्तीच्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे अपहरणकर्त्याने त्याच्या हाताला इजा केली. तरीही तो मुलगा कसाबसा त्याच्या तावडीतून सुटून पळाला आणि थेट आपल्या नातेवाईकांच्या घरी गेला.

भुईपाल हा ग्रामीण भाग असल्याने येथे सीसीटीव्ही कॅमेरे नगण्य प्रमाणात आहेत. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. होंडा पंचायतीने गावातील प्रमुख ठिकाणी कॅमेरे बसविण्याची जबाबदारी घ्यावी, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास वाळपईचे पोलिस उपनिरीक्षक सोहम मळीक करत आहेत.

Goa Crime News
Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

शाळेजवळच घडली घटना

भुईपाल येथे घडलेली ही घटना धक्कादायक असून, भर वस्तीतून मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथून काही अंतरावरच विद्यालय आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Goa Crime News
Minor Girl Kidnapping: कुंक्कळीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची कर्नाटकातून सुटका; चिपळूणचा आरोपी अटकेत, 7 दिवसांची पोलिस कोठडी

अपहरणकर्त्यांना ताब्यात घ्या

मुलाच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल करताना सांगितले की, ज्या क्षणी आम्हाला घटनेची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही वेळ न दवडता थेट पोलिस स्थानक गाठले. भर वस्तीत मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न होणे, ही गंभीर बाब आहे. आमच्या वस्तीत अनेक लहान मुले आहेत. त्यामुळे पोलिसांनी योग्य तो तपास करून अपहरणकर्त्याला ताब्यात घ्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com