गोव्यातील पशुधन धारकांसाठी महत्वाची बातमी, ब्रुसेलोसिस लसीकरण कार्यक्रम जाहीर, जाणून घ्या तारखा

शेतकऱ्यांना लसीकरण कार्यक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Cow
CowDainik Gomantak

Brucellosis Vaccination Programme Goa: पशुसंवर्धन खात्याने भारत सरकारच्या राष्ट्रीय प्राणी रोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) या योजने अंतर्गत ब्रुसेलोसिस लसीकरण कार्यक्रमास सुरवात केली आहे.

पशुसंवर्धन खात्याच्या वतीने तीस दिवसांचा लसीकरण कार्यक्रम जाहीर केला असून, शेतकऱ्यांना लसीकरण कार्यक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोवा पशुसंवर्धन खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ब्रुसेलोसिस लसीकरण कार्यक्रम 12 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालू राहणार आहे. 30 दिवसांच्या या लसीकरण कार्यक्रमात 4 ते 8 महिने वयोगटातील सर्व गायी आणि म्हशींच्या मादी वासरांचे लसीकरण करण्यात येईल.

लसीकरणानंतरचे सेरा नमुने निवडक गावांमधून गोळा केले जातील जेणेकरून रोगप्रतिकारक स्थिती तपासली जाईल. असे खात्याने म्हटले आहे.

Cow
Old Goa: ओल्ड गोव्यात उघड्या खड्ड्यात पडलेल्या 5 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, गुन्हा दाखल

नियमावलीनुसार लसीकरणानंतर प्राण्यांच्या कानाला टॅग लावले जातील. डेअरी शेतकऱ्यांनी या लसीकरण कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ब्रुसेलोसिस संसर्गजन्य असून, याची लागण झाल्यास त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होतो असे खात्याने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com