Braille Library: अंध मुले घेणार वाचनानंद! कुडचडेत चेतना स्‍कूलचे अत्‍याधुनिक ‘ब्रेल वाचनालय'

Braille Library Curchorem Goa: वाचनाचा आनंद घेत आपल्‍या कल्‍पनांच्‍या भराऱ्या घेण्‍याचे भाग्‍य आता दृष्‍टीहिन असलेल्‍या विशेष क्षमतेच्‍या मुलांनाही घेता येणे शक्‍य झाले आहे.
Braille library curchorem
Braille library goaDainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळ्येकर

वाचनाचा आनंद घेत आपल्‍या कल्‍पनांच्‍या भराऱ्या घेण्‍याचे भाग्‍य आता दृष्‍टीहिन असलेल्‍या विशेष क्षमतेच्‍या मुलांनाही घेता येणे शक्‍य झाले आहे. कुडचडे येथील चेतना स्‍कूल या विषेश क्षमतेच्‍या मुलांसाठी असलेल्‍या शाळेमध्‍ये आता अत्‍याधुनिक सुविधा असलेले ब्रेल लिपी वाचनालय सुरू केल्‍याने आता स्‍वत:च्‍या डोळ्‍यांनी जग न पाहिलेल्‍या मुलांनाही या तंत्रज्ञानाच्‍या आधारे कल्‍पनांच्‍या भराऱ्या घेणे शक्‍य होणार आहे.

सुमारे १५ लाख रुपये खर्चून सुरु केलेले हे सुसज्‍ज असे ब्रेल वाचनालय दक्षिण गोव्‍यातील अशाप्रकारचे पहिलेच वाचनालय असून गोवा सरकारच्‍या समाज कल्‍याण खात्‍याच्‍या मदतीतून हा प्रकल्‍प सुरू केल्‍याची माहिती चेतना स्‍कूलचे प्रवर्तक तथा चेतना एज्‍युकेशन सोसायटीचे अध्‍यक्ष राजू मेघश्‍‍याम नायक यांनी दिली.

हे वाचनालय म्‍हणजे, विशेष मुलांसाठीच्या शाळेच्या भिंतींमध्ये सुरू झालेली एक नवी क्रांतीच असे म्‍हणावी लागेल. या शाळेतील शिक्षण आता दृष्‍टीपुरतेच मर्यादित रहाणार नसून ज्‍यांना दिसत नाही अशा मुलांनाही आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत शिक्षणाचा आणि नवीन माहितीचा लाभ घेता येणे शक्‍य झाले आहे.

या वाचनालयाचे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटनकरण्‍यात आले.राजू नायक म्हणाले, वाचन क्षमता वाढवण्‍यासाठी टेक्स्ट मॅग्निफायर्स, वस्‍तूंचा आकार दाखविणारे ‘ब्रेल एम्बॉसर’ आणि टॅक्टाइल मार्कर अशा विविध सुविधा असून या वाचनालयात असलेली ‘टॅक्टाइल स्टोरीबुक्स’ हे उपकरण या विशेष क्षमतेच्‍या मुलांच्‍या कल्‍पनांच्या भराऱ्यांना अधिक व्‍यापक करू शकते. याशिवाय हेडफोन्‍स आणि इतर सहाय्‍यक उपकरणाद्वारे मुले न दिसताही वाचनाचा आनंद घेऊ शकतात.

या वाचनालयात जी उपकरणे आहेत ती खास दृष्‍टीहिन मुलांच्‍या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्‍या असून या नवीन तंत्रज्ञानाच्‍या सॉफ्‍टवेअरमुळे आता अशा मुलांनाही वाचनाचा आनंद घेता येणे शक्‍य झाले आहे, अशी प्रतिक्रिया नायक यांनी व्‍यक्‍त केली. आम्‍हाला ही सोय उपलब्‍ध करुन दिल्‍याबद्दल समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचे ऋणी आहाेत, असेही ते म्‍हणाले. हा उपक्रम आमच्‍या शाळेत सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याच्या आणि सर्वांसाठी शिक्षण हे ब्रीद जपण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर भर देतो, असे ते म्‍हणाले.

Braille library curchorem
Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

अमूर्त संकल्पना होती जिवंत !

राजू नायक यांनी सांगितले, या वाचनालयात दृष्टिहिनांसाठी सुलभता व्‍हावी, या उद्देशाने विविध सहाय्यक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. दैनंदिन हाताळणीसाठी व्हिजन वॉलेट्स आणि बोलणारी घड्याळे, अमूर्त संकल्पनांना जिवंत करणारे ‘थ्री डी’ टॅक्टाइल पेन आणि विशेषतः दृष्टी आणि श्रवणदोष असलेल्यांसाठी डिझाइन केलेले ब्रेल एक्सेल सिस्टम आहेत. स्मार्ट चष्मे आणि त्वरित माहिती स्‍कॅन करणारे स्कॅनर याद्वारे मुलांना दृकश्राव्‍य पद्धतीने माहिती मिळू शकते.

Braille library curchorem
School Bag: दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी 'प्रसन्न' नसेल तर त्याला अभ्यास कसा पेलवेल?

नीलेश काब्राल, आमदार कुडचडे

ज्‍यांना हे जग पाहण्‍याची संधी देवाने दिली नाही, अशा मुलांनाही आता या नवीन तंत्रज्ञानामुळे स्‍वत:चे असे नवीन जग पाहता येणार आहे. या वाचनालयाची आणखी एक खासियत म्‍हणजे या मुलांना प्रशिक्षित करण्‍यासाठी ज्‍या दोन युवा शिक्षिकांची नेमणूक केली आहे, त्‍यातील एक पूर्णत: अंध तर दुसरी ९० टक्‍के अंध आहे. आणि याहून विशेष बाब म्‍हणजे, या दोन्‍ही शिक्षिका विद्यार्थ्‍यांना सहजपणे शिकवित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com