Bori News : आयुर्वेदाची प्रगती, विकासासाठी सामूहिक प्रयत्‍नांची गरज : बांदेकर

Bori News : सहकारी यांनी आपल्याला आयुर्वेदबाबत कशाप्रकारे अनुभव आला याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
Bori
BoriDainik Gomantak
Published on
Updated on

Bori News :

बोरी, आपल्‍या देशात तीन हजार वर्षांपासून आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे. विविध आजारांबाबत आयुर्वेदामध्ये आणखी संशोधन झाले तर त्याचा अनेक लोकांना चांगल्या पद्धतीने उपयोग होईल.

आयुर्वेदाचा विकास व प्रगती आणखी जोराने व्हावी यासाठी आपण एकमेकांच्या सहकार्याने कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांनी केले.

फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्राचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी डॉ. बांदेकर बोलत होते. व्‍यासपीठावर प्रा. डॉ. अनुरा बाळे, व्यवस्थापन समितीचे नितीन सहकारी व विद्यार्थी प्रतिनिधी सरचिटणीस हर्षद सहकारी उपस्थित होते.

Bori
भाजपच्या दक्षिण गोवा महिला उमेदवार पल्लवी धेंपे कोण आहेत?

आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गोमेगोमध्ये रिसर्च करण्यासाठी जी यंत्रणा लागेल साधनसुविधा लागेल, ती आपण पुरवण्यास नेहमीच हातभार लावणार आहे. एकमेकांच्या सहकार्याने हे संशोधन होणे आज काळाची गरज आहे, असे बांदेकर म्हणाले.

सहकारी यांनी आपल्याला आयुर्वेदबाबत कशाप्रकारे अनुभव आला याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अनुरा बाळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला तर आभार हर्षद इनामदार यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com