Pramod Yadav
भाजपने दक्षिण गोव्यातून उद्योजक पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी दिलीय.
पल्लवी धेंपे ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी आहेत.
श्रीनिवास धेंपे यांचे पणजोबा वैकुंठराव धेंपे यांनी 1963 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
पल्लवी धेंपे, धेंपे इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात, त्या धेंपे चॅरिटीज ट्रस्टच्या विश्वस्त देखील आहेत.
पल्लवी यांनी गोव्यातील पार्वती चौगुले महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून पदवी मिळवली आहे. यासह त्यातून एमआयटी पुण्यातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या निवडणूक रोखेच्या माहितीनुसार धेंपो यांनी 1.25 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले होते.
भाजपने पहिल्यांदाच गोव्यातून महिला उमेदवाराची घोषणा केलीय, माझा भाजपच्या विचारधारेवर विश्वास असल्याचे पल्लवी धेंपे म्हणाल्या आहेत.