Bori News : भजन भक्तीसाठी मनाच्या एकाग्रतेची गरज : दुर्गाकुमार नावती

Bori News : तामशिरे, बोरी येथे भजन कार्यशाळेचे उद्‍घाटन
Bori
Bori Dainik Gomantak

Bori News :

बोरी, भजन भक्तीसाठी मनाच्या एकाग्रतेची गरज असते. भजनातून आपण परमेश्वराची आळवणी करतो. नामस्मरणाची ही आपली ही परंपरा आणि ओळख सर्वार्थाने जगविण्याची आणि जोपासण्याची गरज आहे.

त्यासाठी भजन भक्तीमागील संकल्पना आणि विचार समजून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत दुर्गाकुमार नावती यांनी व्यक्त केले.

तामशिरे, बोरी येथील श्री नवदुर्गा कलानंद या संस्थेने श्रीकृष्ण सांस्कृतिक संस्था, कुंडईच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भजन कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नवदुर्गा कलानंद संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कलाकार गोकुळदास नाईक, अजित सतरकर, नयना नाईक, सरिता वळवईकर, श्रद्धा तारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Bori
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

भजन गायकीचा प्रवाह आज बदलतो आहे. अर्थातच हे सुलक्षण नाही. भजनाच्या शुद्ध प्रवाहामध्ये संचरलेली तानबाजी, सरगम, शब्दभेद आदीमुळे भजन हा सामूहिक भक्तीचा प्रकार सद्यस्थितीत निष्प्रभ वाटतो. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भजन भक्तीच्या सादरीकरणाचा साचा बिघडेल. त्यासाठी भजनी कलाकारांनी भावाविष्कार किंवा भक्तीतून अभिव्यक्त होण्याची नितांत गरज आहे, असे नावती म्हणाले.

कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले भजन कलाकार घडविण्याची मनीषा उराशी बाळगून ही पहिली वहिली कार्यशाळा संस्थेच्या प्रमुख सहभागातून आयोजित करण्यात आल्याचे गोकुळदास नाईक यांनी सांगितले. अथश्री नाईक, सान्वी तारी, समृद्धी नाईक, श्रेय सतरकर आदींनी इशस्तवन सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com