'बुकवर्म': गोव्याच्या बालवाचनाला नवी दिशा; शंभरहून अधिक शाळांमध्ये 'साक्षरता क्रांती'

Bookworm organization Goa: वाचनाच्या मूलभूत आनंदापासून वंचित असलेल्या मुलांना वाचनाची संधी मिळावी आणि त्यांच्यात पुस्तकांविषयी आवड निर्माण व्हावी, या ध्येयाने 'बुकवर्म' संस्था गोव्यात कार्यरत आहे
Bookworm Goa
Bookworm GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वाचनाच्या मूलभूत आनंदापासून वंचित असलेल्या मुलांना वाचनाची संधी मिळावी आणि त्यांच्यात पुस्तकांविषयी आवड निर्माण व्हावी, या ध्येयाने 'बुकवर्म' (Bookworm) संस्था गोव्यात कार्यरत आहे. वाचनाला भाषेचा आणि बहुविध वास्तवांचा मुख्य आयाम मानून, 'बुकवर्म' मुलांना सामाजिक-सांस्कृतिक चौकटीपलीकडे जाऊन सर्वांगी विचार करण्याचे सामर्थ्य देतो.

ग्रंथालयाचे वेगळे स्वरूप: 'पंखांचे पुस्तके'

'बुकवर्म'ने विशेषतः मुलांसाठी ग्रंथालयाची स्थापना केलीये. मळा येथील सरस्वती विद्यालय (जुनी मुश्टिफंड शाळा) येथे त्यांचे मुख्य ग्रंथालय असून, हळदोणे, साळगाव आणि सरौली येथे त्यांची तीन उप-ग्रंथालये कार्यरत आहेत. या ग्रंथालयांचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील पुस्तके केवळ कपाटात बंद नाहीत; तर इथे प्रत्येक पुस्तकाला जणू 'पंख लागले आहेत'. याचा अर्थ, पुस्तके बंदिस्त न राहता वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे थेट मुलांपर्यंत पोहोचवले जातात.

Bookworm Goa
International Literacy Day: 1950मध्ये टुरिंग टेस्ट सुचवली, यंत्राची बुद्धिमत्ता तपासली गेली; AI साक्षर होणं काळाची गरज

वाचनप्रसाराचे बहुआयामी उपक्रम

'बुकवर्म' अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे वाचनाचा प्रसार करतोय. यामध्ये लायब्ररीज इन स्कूल्स प्रोग्राम (LiS), मोबाईल आउटरीच प्रोग्राम (MOP), प्रोफेशनल डेव्हलमेंट प्रोग्राम (Prod), व्हिज्युअल आर्ट्स प्रोग्रॅम (VAP) आणि होम बेस्ड लायब्ररी (HBL) - बोरो यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे पुस्तकांचा 'स्वाद आणि सुगंध' सर्वत्र पसरवला जातोय.

GSCERT आणि सिप्ला फाउंडेशनचे सहकार्य:

गोवा शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राज्य परिषदेच्या (GSCERT) आणि सिप्ला फाउंडेशनच्या सहकार्याने 'बुकवर्म'चा उपक्रम गोव्यातील शंभरहून अधिक शाळांमध्ये कार्यरत आहे, ज्यामुळे प्राथमिक शाळांमध्ये साक्षरतेत मोठे सकारात्मक बदल घडतायत.

तीन प्रमुख उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सहभाग

या कार्यक्रमांतर्गत गोव्यात तीन महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत, जे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि सर्जनशीलता वाढवली जातेय:

१. इंडिपेंडंट शाळा उपक्रम: ६० हून अधिक शाळांमध्ये शिक्षक स्वतः ग्रंथालय चालवत आहेत. 'बुकवर्म' टीम दर तीन महिन्यांनी या शाळांना भेट देते. या सत्रांमध्ये मुले गोष्टी वाचून त्यावर आधारित कलाकुसरीचे काम करणे किंवा सामाजिक विषयांवर चर्चा करणे (उदा. 'Flood in Basti' वाचून पूरस्थितीवर चर्चा) यात उत्साहाने भाग घेतात.

२. लीड शाळा उपक्रम: या शाळांना अंदाजे ५० पुस्तके दिली जातात आणि दर पंधरवड्याने वाचन सत्रे आयोजित केली जातात. येथे 'बुक टॉक', 'रीड-अलाऊड', नाट्य सत्रे (Theatre Games) यांमध्ये मुले सहभागी होतात. एका शाळेत 'Ajiri's Story' वाचून एका विद्यार्थ्याने मांजरासोबतचा स्वतःचा भावनात्मक अनुभव कथन केला.

३. ट्रॅव्हलिंग लायब्ररी उपक्रम: दोन विशेष व्हॅन (Van) ३० शाळांपर्यंत पुस्तके पोहोचवतात. पुढील आठवड्यात व्हॅन कोणती नवीन पुस्तके आणेल, याची मुले आतुरतेने वाट पाहतात.

शिक्षण आणि सर्जनशीलतेवर सकारात्मक परिणाम

वाचनाचा भाषिक विकास, शुद्धलेखन आणि सर्जनशीलतेवर मजबूत संबंध असतो. 'बुकवर्म'चे उपक्रम केवळ पुस्तके पुरवण्यापुरते मर्यादित नसून, कथाकथन (Storytelling) आणि कला उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत लक्षणीय सुधारणा घडवत आहेत. कथा वाचनाच्या अध्यापनशास्त्राचा वापर करून 'बुकवर्म' साक्षर आणि गैर-साक्षर जगाला जोडण्याचे उत्तम कार्य करत आहे.

-विश्वनाथ भाटीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com