Nirajsingh Rathod भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय साहाय्यक असल्याचे सांगून भाजपच्याच आमदारांना मंत्रिपदाची बोगस ऑफर देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.
त्यात पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह महाराष्ट्रातील चौघे आणि नागालँडच्या एका आमदाराचा समावेश आहे. आर्लेकर वगळता तीन आमदारांकडून तोतया ‘पीए’ नीरजसिंग राठोड याने पैसे घेतल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील’, असे सांगून नीरजसिंह याने आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी या प्रकरणी तोतया पीएला अहमदाबादेतील मोरबी येथून अटक केली. नीरजसिंह राठोड हा टाइल्स विक्रेता असून त्याने एकट्याने हे केले की यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे त्याने सहाही आमदारांकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली असताना त्यापैकी तीन आमदारांनी त्याला पैसे दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.