Illegal Construction: गिरकरवाडा-हरमल येथील बेकायदा हॉटेल्स, रेस्ट हाऊस अशा आस्थापनांवर कारवाई करण्याची मोहीम शुक्रवारपासून सुरू झाली. खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांच्या बंदोबस्तात 51 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर दिवसभरात 10 बांधकामे सील करण्यात आली.
उर्वरित कारवाई सोमवारी करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गिरकरवाडा-हरमल येथील अनेक बांधकामे अवैध असल्याचे खंडपीठात सुरू असणाऱ्या सुनावणीवेळी स्पष्ट झाले होते. त्यानंतर संबंधित आस्थापनांना टाळे ठोकण्याचा आदेश जारी झाला होता. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी १० वाजता कारवाईस प्रारंभ झाला.
पणजीहून पोलिसांची व्हॅन दाखल झाली. त्यानंतर अपवाद वगळता कारवाईला कोणी विरोध केला नाही. यावेळी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, मामलेदार उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दाखले नसल्याने कारवाईचे पाऊल उचलण्यात आले.
गिरकरवाडा येथील कारवाई खंडपीठाच्या आदेशानुसार होत आहे. त्यामुळे अधिक न बोलणे उचित ठरेल, अशी प्रतिक्रिया काही व्यावसायिकांनी दिली. न्यायालयाचा दणका इतका मोठा असेल, अशी कल्पना कुणालाच नव्हती, असाही सूर व्यक्त झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.